Join us  

'लोकांचा विचार न करता...'; अखेर सानियासोबतच्या घटस्फोटावर शोएबने सोडलं मौन, दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 3:24 PM

Shoaib malik: शोएबने पहिल्यांदाच त्याच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे. सोबतच ट्रोलर्सला उत्तर सुद्धा दिलं आहे.

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा (sania mirza) आणि पाकिस्ताचा माजी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib malik) यांनी नुकताच घटस्फोट झाला आहे. या दोघांनी परस्पर संमतीने काडीमोड घेतला. विशेष म्हणजे सानियाला घटस्फोट दिल्यानंतर शोएबने तिसऱ्यांदा त्याचा संसार थाटला आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. या सगळ्या प्रकरणामुळे शोएब प्रचंड ट्रोल झाला. भारतासह पाकिस्तानमधील लोकांनीही त्याला कमालीचे खडेबोल सुनावले. या सगळ्यावर आता पहिल्यांदाच तो व्यक्त झाला आहे.

अलिकडेच शोएबने एका पाकिस्तानी पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सानियासोबत घेतलेला घटस्फोट, सनासोबतचं तिसरं लग्न आणि ट्रोलिंग या सगळ्यावर भाष्य केलं आहे.

ट्रोलिंगवर काय म्हणाला शोएब?

लोक काय विचार करतील किंवा ते काय म्हणतील याचा विचार न करता तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय ते तुम्ही केलं पाहिजे. भलेही तुम्हाला सतत वाटेल की लोक काय म्हणतील, काय विचार करतील पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मनाचंच ऐका. मग त्यासाठी १० वर्ष लागू देत किंवा २० वर्ष. तुम्ही काही करा किंवा करु नका लोक तरी सुद्धा बोलणारच आहेत, असं शोएब म्हणाला.

दरम्यान, शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केलं आहे. त्याचं हे तिसरे लग्न आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएबचं लग्न झालं होतं. या दोघांनी जवळपास १४ वर्ष संसार केला. मात्र, त्यानंतर शोएबने सानियापासून विभक्त होण्याचा निर्णय घेत सनासोबत निकाह केला.

टॅग्स :बॉलिवूडशोएब मलिकसानिया मिर्झासेलिब्रिटी