Join us  

अखेर शिवसेनेचा वाघ उद्धवने हिंमत दाखवली...!  राम गोपाल वर्माच्या पोस्टने भडकले अर्णब गोस्वामींचे फॅन्स

By रूपाली मुधोळकर | Published: November 06, 2020 2:08 PM

काय म्हणाले राम गोपाल वर्मा?

ठळक मुद्देकामावर लक्ष दे. चित्रपट बनव. शेवटी कितीही चाटुगिरी केली, तरी तुला कोणी पुरस्कार देणार नाही...,’अशा शब्दांत एका युजरने राम गोपाल वर्मा यांना ट्रोल केले.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचे संपूर्ण देशभर पडसाद उमटले. काहींनी या अटकेचे स्वागत केले, तर काहींनी तीव्र विरोध. बॉलिवूडही यावरून दोन गटात विभागलेले दिसले. कंगना राणौत, मुकेश खन्ना अशा काहींनी अर्णबच्या अटकेविरोधात आवाज बुलंद केला. याचदरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. अखेर शिवसेनेच्या वाघाने हिंमत दाखवली, अशा शब्दांत त्यांनी अर्णब गोस्वामींना जोरदार टोला लगावला.

काय म्हणाले वर्मा

शिवसेनेचा वाघ उद्धव ठाकरेने आपल्या पित्यासारखी हिंमत दाखवली आणि भूंकणा-या मांजरीला न्यायालयाच्या पिंज-यात कैद करण्याचे शौर्य दाखवले, अशी आशयाची पोस्ट राम गोपाल वर्मा यांनी केली. या पोस्टमध्ये त्यांनी अर्णब यांच्या नावाचा उल्लेख टाळला. पण त्यांची ही पोस्ट कोणासाठी आहे, हे कळायला लोकांना वेळ लागला नाही. कोणत्या शाळेत शिकला आहात सर तुम्ही? ; नेटक-यांनी केले ट्रोल

राम गोपाल वर्मांची ही पोस्ट पाहून साहजिकच अर्णब गोस्वामींचे फॉलोअर्स भडकले. मग काय, त्यांनी वर्मा यांना जबरदस्त ट्रोल केले.‘काय विनोद आहे, रिअल टायगर इन शिवसेना... हा..हा..हा... फक्त एकच वाघ होता, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. तसे तू आपल्या कामावर लक्ष दे. चित्रपट बनव. शेवटी कितीही चाटुगिरी केली, तरी तुला कोणी पुरस्कार देणार नाही...,’अशा शब्दांत एका युजरने राम गोपाल वर्मा यांना ट्रोल केले.एका युजरने राम गोपाल वर्माच्या पोस्टवरून त्यांचे अज्ञान काढले. ‘कोणत्या शाळेत शिकला आहात सर तुम्ही? मांजरी भूंकत नसतात.. ’, असे या युजरने लिहिले. तर आणखी एकाने ‘आता एकदा भुंकणा-या मांजरीवर सिनेमा बनवा..,’ अशा शब्दांत वर्मा यांच्या पोस्टची खिल्ली उडवली.

‘मुंबईत अर्णब आणि कंगनासोबत जे झाले यानंतर सुशांत केसमध्ये न्याय मिळेल अशी कोणतीच आशा मला दिसत नाही. अर्णबसोबत जे झाले ते फार चुकीचे होते,’असे एका युजरने राम गोपाल वर्मांच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिले.

एका युजरने राम गोपाल वर्मा थेट उंदराची उपमा दिली. ‘एक अयशस्वी माणूस काहीही बोलू शकतो. कारण त्याच्याकडे बोलण्याशिवाय दुसरे करण्यासारखे काहीही नसते. अर्णव वाघ आहे वाघ.. तो मांजर आणि तू उंदीर...’, असे या युजरने लिहिले.

टॅग्स :राम गोपाल वर्माअर्णब गोस्वामी