Join us  

शिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 9:20 PM

‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदेने गतवर्षी ‘मारो लाईन’ या आयटम साँगद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. आता मात्र शिल्पा खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. 

‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदेने गतवर्षी ‘मारो लाईन’ या आयटम साँगद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. आता मात्र शिल्पा खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. होय, सलमान खानची कथित गर्लफ्रेन्ड युलिया वंतूर हिच्या आगामी चित्रपटात शिल्पा एका दमदार भूमिकेत दिसणार असल्याची खबर आहे.  ‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’ या चित्रपटात युलिया वंतूर मुख्य भूमिकेत आहे. येत्या १२ तारखेला मथुरेत या चित्रपटाचे शूटींग सुरू होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर जारी केले गेले. युलियाच्या याच चित्रपटात शिल्पा शिंदेची वर्णी लागली आहे. या शिल्पा सेकंड लीड रोलमध्ये दिसणार असल्याचे कळतेय. निश्चितपणे शिल्पाच्या करिअरसाठी हा मोठा टर्निंग पॉर्इंट असणार आहे.‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’ हा चित्रपट एका विदेशी मुलीची कथा आहे. ही मुलगी भगवान कृष्णाची मोठी भक्त असते. याचदरम्यान तिच्या आयुष्यात एक मोठी घटना घडते, अशी याची ढोबळ कथा आहे.‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत शिल्पा शिंदेने साकारलेली अंगूरी भाभीची भूमिका प्रचंड लोकप्रीय झाली होती. निर्मात्यांसोबतच्या वादामुळे शिल्पाने ही मालिका मध्येच सोडली होती. यानंतर तिच्या जागी शुभांगी अत्रेची वर्णी लागली होती. ‘भाभीजी घर पर है’ सोडल्यानंतर शिल्पा शिंदे ‘बिग बॉस11’मध्ये दिसली. केवळ दिसलीच नाही तर हा शो तिने जिंकला.

टॅग्स :शिल्पा शिंदे