Join us  

या एकाच अटीवर शिल्पा शेट्टी सुनेला देणार हा 20 कॅरेट डायमंडचा जीवापाड जपलेला दागिना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 4:31 PM

दागिना म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जीवाभावाचा विषय. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दागिन्यांची प्रचंड आवड आहे.

ठळक मुद्देशिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रन्टबाबत सांगायचे तर तिने नुकतंच हंगामा २ सिनेमाचे शूटींग पूर्ण केले.

दागिना म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जीवाभावाचा विषय. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दागिन्यांची प्रचंड आवड आहे. अर्थात सगळ्या बायकांनाच ती असते. पण शिल्पा शेट्टीची बातच और. तिच्याकडे एकापेक्षा एक सुंदर, महाग दागिन्यांचे कलेक्शन आहे. यातला सर्वात आवडीचा दागिना कोणता तर तिची डायमंड रिंग. होय, शिल्पाकडे 20 कॅरेट हि-याची अंगठी आहे. ही अंगठी तिला  अतिप्रिय आहे. आता हा जीवापाड जपलेला दागिना सुनेला द्यायची वेळ आली तर? तर हे 20 कॅरेटचे डायमंड ती  सुनेला देण्यास तयार आहे. अर्थात एका अटीवर.

होय, होणारी सून नीट वागली तरच शिल्पा हे 20 कॅरेटचे डायमंड सूनेला देईन. एका ताज्या मुलाखतीत खुद्द शिल्पाने हा खुलासा केला. ‘ मी नेहमीच माझ्या मुलाला म्हणते, की जर तुझी बायको माझ्याशी नीट वागली तरच मी तिला माझे 20 कॅरेटचे डायमंड देईल. अन्यथा यापेक्षा कमी गोष्टीवर तुला समाधान मानावे लागेन,’ असे ती म्हणाली. मला दागिन्यांची आवड आहे आणि मी खूप दागिने खरेदी करते. एक दिवस हेच  दागिने खजिनासारखे ठरतील, असे मला वाटते, असेही तिने सांगितले.शिल्पाने 2009 मध्ये राज कुंद्राशी लग्न केले. या दोघांना वियान हा मुलगा तर समिशा ही मुलगी आहे.

   राजने दिली होती 5 कॅरेटची डायमंड रिंगएका व्हिडीओत शिल्पाने राज कुंद्राने तिला प्रपोज करताना 5 कॅरेटची डायमंड रिंग दिल्याचे सांगितले होते.  या व्हिडीओत ती म्हणते, ‘11 वर्षांपूर्वी तू मला प्रपोज केले होते. मला अजूनही आठवते की तू पॅरिसमधल्या हॉटेलमधील बँक्वेट हॉलच बुक केला होतास. अचानक तू रिंग देत मला प्रपोज केले होते. हे असे प्रपोजल होते, जे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. ती एक 5 कॅरेटची डायमंड रिंग होती. हो,फक्त 5 कॅरेटची. तुझ्या प्रपोजलवर होकार देताना मी हाच विचार करत होते. मी हो म्हणायला दोन सेकंद घेतलेत, कदाचित तू माझ्या मनातल्या भावना ओळखल्या असाव्यात. वेडिंग रिंग यापेक्षाही मोठी असेल, असे यानंतर तू लगेच म्हणालास आणि मी लगेच होकार दिला होता.’

शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रन्टबाबत सांगायचे तर तिने नुकतंच हंगामा २ सिनेमाचे शूटींग पूर्ण केले. या सिनेमाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये बऱ्याच वर्षांनी परत येणार आहे. त्यासोबतच शिल्पा शेट्टी 'निकम्मा' सिनेमातही दिसणार आहे. 

शिल्पा शेट्टी पूजेसाठी पोहोचली अनिल कपूरच्या घरी, फोटोग्राफर्सला म्हणाली - थांबा, जवळ नका येऊ....

टॅग्स :शिल्पा शेट्टी