Join us  

एकेकाळी शिल्पाला बॉलिवूडमध्ये 'या' वाईट गोष्टींचा करावा लागला होता सामना, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 11:52 AM

शिल्पा शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून सिल्वर स्क्रिनपासून लांब आहे. मात्र ती छोट्या पडद्यावर अॅक्टिव्ह असते. शिल्पाने तिच्या स्ट्रगलिंगच्या दिवसातील काही आठवणी शेअर केल्या

ठळक मुद्देशिल्पाने करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केलीशिल्पाने 'बाजीगर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

शिल्पा शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून सिल्वर स्क्रिनपासून लांब आहे. मात्र ती छोट्या पडद्यावर अॅक्टिव्ह असते.  'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'शी बोलताना शिल्पाने तिच्या स्ट्रगलिंगच्या दिवसातील काही आठवणी शेअर केल्या. शिल्पा म्हणाली,'' मी उंच, बारीक आणि काळी होती. मी ग्रॅज्युएशन केल्यानंतर माझ्या वडिलांसोबत काम करत होते.  मला काही तरी वेगळे आणि चांगलं करायचे होते. एकदा मस्तीमध्ये मी एक फॅशन शोमध्ये सहभाग घेतला. त्या दरम्यान माझी ओळख एक फोटोग्राफरशी झाली ज्याला माझे फोटो काढायचे होते. माझे जे फोटो काढण्यात आले ते पाहुन मी हैराण झाले. मी करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. मात्र सगळं काही सहजतेने मिळत नाही. मी फक्त 17 वर्षांची होती जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रित पाऊल ठेवले. मला हिंदीत नीट बोलता पण येत नव्हते.''

''कॅमेऱ्याच्या समोर येण्यासाठी पण भीती वाटायची. मी त्याजागी पोहोचले होते जिथं मला सिनेमा मिळायचे बंद झाले होते. मला आठवतंय काही निर्मात्यांनी मला सिनेमातून विनाकारण बाहेर काढले होते. तरीही मी प्रयत्न करणं सोडलं नाही. मला बरचं चागलं -वाईट ऐकावं लागलं. पण मी कधी हार मानली नाही. ''

शिल्पाने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिची जोडी शाहरुख खानसोबत जमली होती. तसेच या चित्रपटात काजोल देखील मुख्य भूमिकेत होती. शिल्पाच्या या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाचे कौतुक झाले होते. पण बाजीगर नव्हे तर गाता रहे मेरा दिल या चित्रपटाद्वारे शिल्पा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती असे तिनेच या कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितले.

टॅग्स :शिल्पा शेट्टी