Join us  

राज कुंद्राशी लग्न केलं म्हणून 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांना शिल्पा शेट्टीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, "त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 1:47 PM

शिल्पाने राज कुंद्राबरोबर पैशासाठी लग्न केल्याचं म्हणत तिला गोल्ड डिगरचा टॅग दिला गेला होता. 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांना शिल्पाने आता सडेतोड उत्तर दिलं आहे. 

अभिनय आणि सौंदर्याने ९०चं दशक गाजवलेली अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. आजही शिल्पाची सुडौल शरीरयष्टी चाहत्यांना आकर्षित करते. एकेकाळी अभिनयाने सिनेसृष्टी गाजवणाऱ्या शिल्पाला मात्र नेटकऱ्यांनी पती राज कुंद्रामुळे ट्रोल केलं होतं. शिल्पाने राज कुंद्राबरोबर पैशासाठी लग्न केल्याचं म्हणत तिला गोल्ड डिगरचा टॅग दिला गेला होता. 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांना शिल्पाने आता सडेतोड उत्तर दिलं आहे. 

शिल्पाने नुकतीच झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "गुगलनुसार, मी राज कुंद्राशी लग्न केलं तेव्हा तो श्रीमंत तरुणांच्या यादीत १०८व्या स्थानावर होता.  पण, मला वाटतं लोक शिल्पा शेट्टीला गुगल करायला विसरले. मी पण तेव्हा श्रीमंत होते. आणि आज आणखी श्रीमंत आहे. मी इनकम टॅक्स, जीएसटी आणि इतर टॅक्सही भरते. राज कुंद्रापेक्षा श्रीमंत असलेल्या व्यक्तींनी मला लग्नासाठी विचारलं होतं. पण, माझ्यासाठी आयुष्यात पैसा म्हणजे सर्वकाही नाही." 

दरम्यान, शिल्पाने २००९ मध्ये राज कुंद्राशी विवाह करत लग्नगाठ बांधली. तिला समिशा आणि विहान ही दोन मुले आहेत. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून बॉलिवूड गाजवलेल्या शिल्पाने नुकतंच ओटीटीवर पदार्पण केलं आहे. रोहित शेट्टी इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमधून शिल्पाने ओटीटी विश्वात पदार्पण केलं. या वेब सीरिजमध्ये ती महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होती. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रासेलिब्रिटी