Join us  

शिल्पा शेट्टी 40 दिवसांनंतर शेअर केला मुलीसोबतचा 'तो' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 3:48 PM

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी 15 फेब्रुवारी  नन्ही परीचे आगमन झाले आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी 15 फेब्रुवारी  नन्ही परीचे आगमन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिल्पाने ही खुशखबर तिच्या फॅन्सना दिली आहे. शिल्पाने या मुलीचं नाव समीशा ठेवलं आहे. शिल्पाने आज समीशाला जन्माला घेऊन 40 दिवस पूर्ण झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले. या पोस्टसोबत शिल्पाने एक तिचा, समीशा, राज कुंद्रा आणि मुलागा वियानचा फोटो शेअर केला आहे. शिल्पा या फोटोत समीशा घेऊन बसलेली दिसतेय. मात्र तिचा चेहरा फोटो कुठे दिसणार नाही यांची काळजी तिने घेतली आहे. शिल्पाच्या या फॅमिली फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

   शिल्पा शेट्टी सरोगेसीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आई झाली आहे. मुलीच्या जन्मानंतर होळीच्या दिवशी ती तिला घरी घेऊन गेली आहे.

राज कुंद्राने ट्वीट करत सांगितले होते की, ही बातमी सांगायला मला किती आनंद होत आहे हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आमच्या घरात एका नव्या सदस्याचे आगमन झाले असून आमच्या मुलीचे नाव समीशा शेट्टी कुंद्रा असे आहे.

शिल्पा आणि राज यांचे लग्न नोव्हेंबर 2009 मध्ये झाले. त्यांना वियान नावाचा मुलगा असून मे 2012 मध्ये त्याचा जन्म झाला आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टी