Join us  

म्हणून शिल्पा शेट्टीने नाकारली होती 'ती' 10 कोटींची जाहिरात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 3:48 PM

कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी शिल्पाने पंतप्रधान सहाय्यता निधीत 21 लाख रुपयांची मदत केली आहे.

अभिनेत्री शिल्पाने शेट्टी काही दिवसांपूर्वी मुलगा वियान सोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओ वियान शिल्पाचे पाय चेपताना दिसतो. सोशल मीडिया हा व्हिडीओ चांगलीच पसंती मिळाली होती.  लोकडाऊन दरम्यान शिल्पा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. 

शिल्पाची बॉलिवूडमधली टॉप मोस्ट फिटेस्ट अभिनेत्री म्हणून ओळख आहे. दोन मुलांची आई असलेली शिल्पा शेट्टी नियमित योगभ्यास करताना दिसते. आपल्या चाहत्यांसोबत ती फिटनेस आणि डाएटच्या टिप्स शेअर करत असते. काही महिन्यांपूर्वी शिल्पाने तिचे फिटनेस अॅप लाँच केले आहे. रिपोर्टनुसार त्यावेळी शिल्पाला स्लिमिंग पिलच्या (बारीक होण्याच्या गोळ्या) जाहिरातीची ऑफर आली होती मात्र शिल्पाने ती नाकारली. या जाहिरातीसाठी शिल्पाला तब्बल 10 कोटी रुपये मिळणार होते.

   रिपोर्टनुसार शिल्पाचे म्हणणे आहे की, तिला ज्या गोष्टींवर विश्वास नाही, ती गोष्ट शिल्पा करणार नाही. या गोळ्या तुम्हाला कोणतेही डाएट न करता वजन कमी करण्याचे आश्वासन देतात. जे आपल्या शरीरासाठी हानिकार असू शकते, असे तिचे म्हणणे होते.

  कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी शिल्पाने पंतप्रधान सहाय्यता निधीत 21 लाख रुपयांची मदत केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती तिने तिच्या चाहत्यांना सांगितली होती.

टॅग्स :शिल्पा शेट्टी