Join us  

बॉलिवूडमधील ही अभिनेत्री 44 व्या वर्षी देखील आहे तितकीच फिट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 6:30 AM

या अभिनेत्रीच्या सौंदर्याची, फिटनेसची नेहमीच चर्चा सोशल मीडियात सुरू असते. तिने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

ठळक मुद्देशिल्पा दररोज न चुकता योगा आणि व्यायाम करते. तिचे योगा आणि व्यायाम करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करते.

शिल्पा शेट्टीने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने त्यानंतर एकाहून एक हिट चित्रपट दिले. तिने धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर देखील तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. सुपर डान्सरमधील सुपर से उपर बोलण्याची तिची अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या कार्यक्रमाचा तिसरा सिझन नुकताच संपला आहे. या कार्यक्रमातील तिचा अंदाज तिच्या प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. 

शिल्पा गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. दरम्यानच्या काळात दोस्ताना यांसारख्या काही चित्रपटात ती आयटम साँगवर थिरकली होती. पण २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या लाईफ इन मेट्रो आणि अपने चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली नव्हती. शिल्पा चित्रपटात काम करत नसली तरी ती ती आजही तितकीच प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्याची, फिटनेसची नेहमीच चर्चा केली जाते. सोशल मीडियावर तिचे फॅन्स तिला नेहमीच मोठ्या संख्येने फॉलो करतात. 

शिल्पा आज 44 वर्षांची असली तरी तिची फिगर 20 वर्षांच्या मुलीइतकीच सुंदर आहे. ती तिच्या फिटनेस आणि स्टाईलसाठी नेहमीच ओळखली जाते. पण या वयात फिट राहाणे कोणासाठी देखील सोपे नसते. त्यासाठी शिल्पाला प्रचंड मेहनच घ्यावी लागते. ती दररोज न चुकता योगा आणि व्यायाम करते. तिचे योगा आणि व्यायाम करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करते. यामुळे तिच्या फॅन्सनादेखील फिट राहायला प्रोत्साहन मिळते. शिल्पाच्या स्टाईल स्टेटमेंटची तर नेहमीच चर्चा असते.  

शिल्पा गेल्या कित्येक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी आता 13 वर्षांनंतर निकम्मा या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. या चित्रपटाद्वारे शिल्पाच्या फॅन्सना तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत असल्याने ते सध्या चांगलेच खूश आहेत.  

टॅग्स :शिल्पा शेट्टी