Join us  

असा होता ‘धडकन’चा खरा क्लायमॅक्स! शिल्पा शेट्टीने १९ वर्षांनंतर केला खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 3:55 PM

अलीकडे  देव-अंजली अर्थात सुनील व शिल्पा दोघेही ‘सुपर डान्सर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोदरम्यान एकत्र आलेत. मग काय, या जोडीने अनेक किस्से शेअर केलेत.

ठळक मुद्देआधी या चित्रपटात सुनील शेट्टीला साईन करण्यात आले. पण तो बिझी असल्यामुळे दिग्दर्शकाने सुनीलच्या जागी अन्य हिरोला घेतले गेले. पण त्याचे काम बघितल्यानंतर दिग्दर्शकाने पुन्हा सुनीलला कॉल केला, ही पडद्यामागची कथाही शिल्पाने सांगितली.

१९ वर्षांपूर्वी म्हणजे सन २००० मध्ये प्रदर्शित ‘धडकन’ हा चित्रपट आजही चाहते विसरलेले नाहीत. देव आणि अंजलीच्या या प्रेमकथेने प्रेक्षकांना वेड लावले होते. सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी हे देव आणि अंजलीच्या भूमिकेत दिसले होते. अलीकडे  देव-अंजली अर्थात सुनील व शिल्पा दोघेही ‘सुपर डान्सर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोदरम्यान एकत्र आलेत. मग काय, या जोडीने अनेक किस्से शेअर केलेत.‘सुपर डान्सर 3’मध्ये शिल्पा जज आहे. आधी शिल्पाने सुनीलचे स्वागत केले आणि मग दोघांनी सेटवरच्या अनेक गोड आठवणी शेअर केल्यात. शिल्पाने यावेळी ‘धडकन’बद्दल एक मोठा खुलासा केला. होय, ‘धडकन’चा क्लायमॅक्स जसा आपण पाहिला तसाच नव्हताच मुळी. शिल्पाने सांगितल्यानुसार, आधी या चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी होता. पण नंतर हॅपी एंडिंगसह तो बदलण्यात आला. शिल्पाने सांगितले की, आधी ‘धडकन’चा क्लायमॅक्स वेगळा होता. मी रामच्या मुलाची आई होणार आहे, असे अंजली देवला सांगते आणि हे ऐकून देवचा मृत्यू होतो, असा क्लायमॅक्स आधी ठरवण्यात आला होता. तसा तो शूटही झाला. पण हा क्लायमॅक्स बराच ट्रॅजिक वाटला. मग ऐनवेळी तो बदलण्यात आला आणि सरतेशेवटी देव  महिमासोबत निघून जातो, असे दाखवण्यात आले.

आधी या चित्रपटात सुनील शेट्टीला साईन करण्यात आले. पण तो बिझी असल्यामुळे दिग्दर्शकाने सुनीलच्या जागी अन्य हिरोला घेतले गेले. पण त्याचे काम बघितल्यानंतर दिग्दर्शकाने पुन्हा सुनीलला कॉल केला, ही पडद्यामागची कथाही शिल्पाने सांगितली. तिने सांगितले की, दिग्दर्शक धर्मेश यांना तीन महिन्यांत हा चित्रपट पूर्ण करायचा होता. त्यांनी देवच्या भूमिकेसाठी सुनील शेट्टीला साईन केले, अंजलीसाठी मला आणि रामच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारला घेतले. पण सुनील त्यावेळी दुसºया चित्रपटात बिझी होता. तारखांच्या समस्येमुळे चित्रपटाचे शूटींग लांबणीवर पडत होते. अखेर धर्मेश यांनी सुनीलच्या जागी एका दुस-या अभिनेत्याला घेतले. त्याच्यासोबत शूटींगही सुरु झाले. पण हा अभिनेता भूमिकेला न्याय देऊ शकत नाही, हे लक्षात येताच धर्मेश यांनी पुन्हा एकदा सुनीलला कॉल केला. असे करता करता हा चित्रपट पूर्ण व्हायला ५ वर्षे लागतील.

टॅग्स :शिल्पा शेट्टीसुनील शेट्टी