Join us  

Raj Kundra:...अन् शिल्पा शेट्टी कोसळली अन् म्हणाली, हे तू का केलंस?; राज कुंद्राकडे बघून रागाने ओरडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 6:13 AM

‘या केसमध्ये शिल्पा शेट्टीचा काहीच रोल नाही. अजूनपर्यंत तिचा या केसशी काहीच संबंध आढळून आलेला नाही

मुंबई /नवी दिल्ली : पोर्नोग्राफी केसमध्ये अटक झाल्यावर राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याच्या व्हॉट्सॲप चॅट, फोन आणि साक्षीदारांच्या जबाबावरून राजची अनेक गुपितं उघड झाली आहेत. याच केसप्रकरणी राजची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यात आली. 

यावेळी अधिकारी राज कुंद्रा यालाही सोबत घेऊन गेले होते, तेव्हा राजला पाहून शिल्पा कोसळली. तिला अश्रू अनावर झाले अन् मग ती म्हणाली, हे सर्व तू का केलंस? या प्रकरणामुळे आपली किती बदनामी झाली? मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा क्राइम ब्रँचचे अधिकारी जुहू येथील शिल्पाच्या घरी पोहोचले तेव्हा शिल्पा राजला बघून रागाने ओरडली. ती रागाने राजला म्हणाली की, ‘या केसने परिवाराची बदनामी केली आहे. अनेक एंडोर्समेंट, बिझनेस डील्स हातून गेल्या आहेत’. 

शिल्पाचा रोल नाहीक्राइम ब्रँचच्या सीनिअर ऑफिसरने सांगितले की, ‘या केसमध्ये शिल्पा शेट्टीचा काहीच रोल नाही. अजूनपर्यंत तिचा या केसशी काहीच संबंध आढळून आलेला नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पुन्हा काही प्रश्न विचारणार नाहीत.’ चौकशीआधी शिल्पा राजवर भडकली होती. पण, नंतर तिने तिच्या पतीची बाजू घेतली आणि म्हणाली की, राज पोर्न कंटेंट बनवत नाही. शिल्पा म्हणाली की, HotShots ॲपसोबत तिचं देणं-घेणं नाही.

 

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रामुंबई पोलीस