Join us  

रियाला मुलाखतीवरून शेखर सुमन यांचा टोला, म्हणाले- माझ्याही स्वप्नात आला सुशांत आणि ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 3:41 PM

रियाने तिच्या मुलाखतीच्या सुरूवातीलाच सांगितलं की, सुशांत तिच्या स्वप्नात आला होता आणि त्यानेच तिला मौन सौडून यावर बोलायला सांगितलं.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्तीने तिच्यावर लावलेल्या सर्वच आरोपांवर एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलंय. रियाने इतक्या दिवसांनी ती मुलाखत का देतीये हेही सांगितलं. रियाने तिच्या मुलाखतीच्या सुरूवातीलाच सांगितलं की, सुशांत तिच्या स्वप्नात आला होता आणि त्यानेच तिला मौन सौडून यावर बोलायला सांगितलं. आता अभिनेते शेखर सुमन यांनी ट्विट करून रियाच्या या गोष्टींची खिल्ली उडवली आहे. 

रिया म्हणाली - सुशांत स्वप्नात आला होता

रियाने चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'सुशांतने मला सांगितलं. सुशांत माझ्या स्वप्नात आला आणि इतरही काही लोकांच्या स्वप्नात तो आला. जे त्याला ओळखत होते. त्यानेच स्वप्नात येऊ सांगितलं की, सत्य सांगा. जाऊन सांगा की, तुम्ही काय आहात. यावर शेखर सुमन यांनीही त्यांच्या खास अंदाजात ट्विट केलं.

शेखर म्हणाले - सुशांत माझ्या स्वप्नात आला

शेखर सुमन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'मला हे मान्य करावंच लागेल की, तिचा परफॉर्मन्स पाहून मी जरा चकितच झालो. तिने पूर्ण तयारीसोबत असं काही ऐकवलं की, मी भावूक झालो. तिचे अश्रू, निर्मलता, सुंदर अभिनय पाहून मी सुद्धा मग्न झालो. आणि मग अचानक सुशांत माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला की, यावर विश्वास ठेवू नका'.

सुरूवातीपासून आवाज उठवत आहेत शेखर सुमन

सुरूवातीपासूनच काही लोक सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या ही आत्महत्या नसून मर्डर असल्याचं म्हणत आहेत. त्यात शेखर सुमन यांचंही नाव सुरूवातीपासून येतं. या केसची सीबीआय चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनीही केली होती. इतकेच नाही तर शेखर सुशांतच्या वडिलांना भेटण्यासाठी आणि शोक व्यक्ती करण्यासाठी पटणा येथेही गेले होते.

दरम्यान, रियाने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. तिच्यावर लावलेले अनेक आरोपही तिने फेटाळून लावले आहेत. अनेक नव्या गोष्टी तिने सांगितल्या आहेत.

'मला सुशांतकडून बाळ हवं होतं'

या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने सांगितले की, 'आम्ही दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की, आयुष्यभर एकमेकांना साथ देतील. मला सुशांत सिंह राजपूतकडून एक बाळ हवं होतं जे हुबेहुब त्याच्यासारखं दिसलं असतं. मी त्याला लिटील सुशी म्हणून हाक मारणार होते. तो पूर्णपणे सुशांतसारखा दिसला असता. आम्ही नेहमीच एका कपलसारखे बोलत होतो. आमची मैत्री प्रेमात कधी बदलली कळलंच नाही'.

पुढे रियाने सांगितले की, 'मला चांगल्याप्रकारे आठवतं की, आमची भेट कशी झाली होती. सर्वातआधी सुशांतनेच मला प्रपोज केलं होतं. माझ्या आयुष्यात येणाऱ्या लोकांमध्ये सुशांत सिंह राजपूत सर्वात इमानदार होता. सुशांतचे आणि त्याच्या वडिलांचं नातं ठिक नव्हतं. त्यामुळे सुशांत नेहमीच चिंतेत राहत होता'.

८ जून रोजी काय झालं?

रियाने सांगितले की, '८ जून रोजी माझं एक थेरपी सेशन बुक होतं. डॉक्टर सुजेन वॉकर यांच्यासोबत. ते सकाळी ११.३० वाजता येणार होते. यातून हे स्पष्ट होतं की ८ जूनला सुशांतचं घर सोडून जाण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मी माझ्या घरी हे थेरपी सेशन करू शकत नव्हते. माझी अजिबात इच्छा नव्हती की, मला माझ्या परिवाराने अशा स्थितीत बघावं. कोणतेही आई-वडील आपल्या मुलांना असं बघू शकणार नाहीत'.

रिया पुढे म्हणाली की, 'त्यामुळे ८ जूनला जेव्हा माझं थेरपी सेशन होतं, तेव्हा मी सुशांतला हे सांगितलं होतं. तर मला नाही म्हणाला. तो म्हणाला की, आज थेरपी सेशन इथे करू नकोस. तू तुझ्या घरी जा. तर मी त्याला म्हणाले की, मला थेरपी सेशन करून जाऊ दे. तरी तो नाही म्हणाला. त्याने मला थेरपी सेशनआधीच जाण्यास सांगितले होते. तो म्हणाला होता की, त्याची बहीण येत आहे. तिचा फोन आला होता'.

 

हे पण वाचा  :

सुशांतच्या बाळाची आई होण्याबाबत पहिल्यांदाच रियाने केला खुलासा, एकमेकांना दिलं होतं वचन!

सुशांतसोबत राहून मी पण डिप्रेशनमध्ये गेले असते, म्हणून मी.....

'तेव्हा सुशांतला कोणतेच डिप्रेशन नव्हते', अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीच्या दाव्यांवर दिले सडेतोड उत्तर

टॅग्स :रिया चक्रवर्तीशेखर सुमनसुशांत सिंग रजपूत