Join us  

Glam Shoot! शहनाज गिलच्या हॉट पोज! डब्बू रत्नानीसोबत केलं खास फोटोशूट, पाहा BTS व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 4:29 PM

Shehnaaz Gill Photoshoot with Dabboo Ratnani : या फोटोशूटचा एक बीटीएस अर्थात बिहाइंड द सीन व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

ठळक मुद्दे‘बिग बॉस 13’ने शहनाज गिल कधी नव्हे इतकी लोकप्रिय झाली.  ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

‘बिग बॉस 13’मुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) जाम खूश्श आहे. कारण काय तर, सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीने (Dabboo Ratnani) तिचे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचा एक बीटीएस अर्थात बिहाइंड द सीन व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.या व्हिडीओत शहनाजचा ग्लॅमरस अंदाज बघण्यासारखा आहे. ती पोज देतेय आणि डब्बू तिचे फोटो क्लिक करतोय. व्हाईट कलरचा शर्ट आणि मल्टीकलर पँटमध्ये शहनाज कमालीची सुंदर दिसतेय. (Shehnaaz Gill Photoshoot with Dabboo Ratnani )हा व्हिडीओ समोर येताच, शहनाजचे चाहतेही क्रेझी झाले आहेत. या फोटोशूटचे फोटो कधी एकदा बघायला मिळतात, असे चाहत्यांना झाले आहे.

शहनाजने अलीकडे एक व्हिडीओ शेअर करत तिचा खास मित्र सिद्धार्थ शुक्लाच्या ‘ब्रोकन बट ब्युटिफुल 3’ या सीरिजचे प्रमोशन केले होते. यानंतर सिद्धार्थ व शहनाज अनेक दिवस ट्रेंडमध्ये होते.

‘बिग बॉस 13’ने शहनाज गिल कधी नव्हे इतकी लोकप्रिय झाली.  ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाऊ लागली.  बिग बॉसच्या घरातील सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाजची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. यामुळे अगदी काही दिवसांत शहनाजची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात वाढली होती.  बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ‘शहनाज गिल की शादी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती दिसली होती. अर्थात हा शो लोकांना फार आवडला नव्हता. 

कधीकाळी केला होता आत्महत्येचा प्रयत्नशहनाजला आज एंटरटेनमेंट क्वीन म्हणूनही संबोधले जाते.   आॅनस्क्रीन सा-यांना खळखळून हसवणारी शहनाज   कधी काळी डिप्रेशनमध्येही गेली होती. इतकेच नव्हेतर तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. खुद्द तिच्या वडिलांनीच या गोष्टीचा खुलासा केला होता. लिव्ह इन पार्टनरसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे शहनाज डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यावेळी सगळ्याच गोष्टी तिला निर्थक वाटू लागल्या होत्या. आयुष्याला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले होते

टॅग्स :डब्बू रतनानीशेहनाझ गिल