Join us  

Shehnaaz Gill Video : स्टार बनताच इतका अ‍ॅटिट्यूड...? शहनाज गिलचं वागणं बघून भडकले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 1:59 PM

Shehnaaz Gill Gets Brutally TROLLED : होय, ‘पंजाबच्या कतरिना’चा एक ताजा व्हिडीओ व्हायरल झाला आणि लोकांनी शहनाजला ट्रोल करायला सुरूवात केली.

शहनाज गिल (Shehnaaz Gill ) आता स्टार झाली आहे. पण सर्वांची लाडकी शहनाज कदाचित रागावली आहे. अरे जरा थांबा... चाहत्यांवर नाही तर पापाराझींवर ती नाराज आहे. होय, ‘पंजाबच्या कतरिना’चा एक ताजा व्हिडीओ बघून तरी असंच वाटतंय. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि शहनाजला लोकांनी ट्रोल करायला सुरूवात केली.

तर झालं असं की, शहनाज व रॅपर एमसी स्क्वेअर ‘बिग बॉस 16’मध्ये आपल्या एका गाण्याचं प्रमोशन करण्यासाठी पोहोचले होते. सेटवर पापाराझी आधीच हजर होते. शहनाज व एमसी स्क्वेअर येताच पापाराझींनी त्यांना घेतलं. पण पापाराझींना पाहून शहनाजच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले.

आधी तिने जरा विचित्र एक्स्प्रेशन दिलेत. एमसीसोबत पोझ द्यायला ती कशीबशाी तयार झाली. पोझ दिल्यानंतर शहनाज वेगळ्याच मूडमध्ये दिसली. हमारा गाना भी प्रमोट कर दो... बस फोटो ही चाहिए इनको... गाना गाओ..., असं ती म्हणाली. यानंतर एमसीने गाणं गायला सुरूवात केली. त्याचं गाणं संपताच शहनाजने पुन्हा एकदा पापाराझींना अ‍ॅटिट्यूड दाखवला. ये सब कट जाएगा... ये पता नहीं कुछ और ही करेंगे, असं म्हणत ती तोºयात निघाली. याचदरम्यान पापाराझींनी तिला सोलो फोटो देण्याची विनंती केली आणि तसा तिचा पारा चढला. हो गया यार, सोलो क्यों दे हम? हम गाना प्रमोट करने आए है, असं म्हणत  एमसी एमसी स्क्वेअरला ओढत ती सेटच्या आत घेऊन गेली.

शहनाजचं हे वागणं नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही. मग काय तिला अनेकांनी फैलावर घेतलं. ही अशी का वागतेय? असं एकाने लिहिलं.  इतका एटीट्यूड का? अशी कमेंट एका युजरने केली. डोक्यात हवा गेलीये वाटतं, अशी कमेंट करत एका युजरने तिला ट्रोल केलं. ही अशी नव्हती, अशी का झाली? असा सवाल एका युजरने केला. शहनाजच्या चाहत्यांनी मात्र तिचं समर्थन केलं. शहनाज चुकीचं काहीही वागलं नाही. दोघांचं गाणं आहे मग ती सोलो पोझ का देईल? अशा शब्दांत अनेकांनी तिची पाठराखण केली.

टॅग्स :शेहनाझ गिलसेलिब्रिटी