Join us  

शेफाली शाहला झाली कोरोनाची लागण? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 11:53 AM

शेफाली शाहला कोरोनाची लागण झाली असल्याची पोस्ट तिच्या फेसबुक अकाऊंटवर करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेफालीने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, माझे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले होते आणि त्यावर मला कोरोनालाची लागण झाली असल्याचे लिहिण्यात आले होते.

शेफाली शाहला कोरोना झाला असल्याची बातमी काही तासांपासून चांगलीच पसरत होती. पण ही गोष्ट खरी नसून ही केवळ एक अफवा असल्याचे शेफालीनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. शेफालीचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले होते आणि त्याद्वारे ही चुकीची माहिती पसरवण्यात आली होती. 

शेफालीने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, माझे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले होते आणि त्यावर मला कोरोनालाची लागण झाली असल्याचे लिहिण्यात आले होते. त्यामुळे मला अनेकांचे फोन, मेसेजेस येत होते. केवळ ओळखीच्या लोकांचेच नव्हे तर माझ्या फॅन्सचे अथवा मी एखाद-दुसऱ्या वेळी भेटले अशा लोकांचे देखील मला मेसेजेस येत होते. काहींना माझे अकाऊंट हॅक झाले आहे का याची देखील शंका येत होती. माझ्या तब्येतीची विचारपूस केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. मी पूर्णपणे व्यवस्थित असून मला काहीही झालेले नाहीये. आम्ही सगळे घराचत असून सगळ्यांनी घरातच राहावे अशी मी लोकांना देखील विनंती करेन...

शेफाली शाहने दिल धडकने दो, वक्त यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. शेफालीने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. हसरतें, कर्ज यांसारख्या तिच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. ती काही महिन्यांपूर्वी दिल्ली क्राईम या वेबसिरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. 

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या