Join us  

श्रिया पिळगावकर म्हणते, हा निव्वळ लोकांचा गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 11:05 AM

श्रिया पिळगावकर अभिनेता राणा दग्गुबत्ती लवकरच 'हाथी मेरे साथी' चित्रपटात दिसणार आहे.

ठळक मुद्देश्रिया पिळगावकर दिसणार 'हाथी मेरे साथी' चित्रपटातमाझ्या करियरची सुरूवात मी मराठी चित्रपटसृष्टीतून केली - श्रिया पिळगावकर

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतीच प्रदर्शित झालेल्या तिच्या 'मिर्झापूर' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ती अभिनेता राणा दुदग्गुबत्तीसोबत 'हाथी मेरे साथी' चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिचा बॉलिवूडमध्ये जास्त वावर असल्यामुळे तिला मराठी चित्रपटसृष्टीत रस नसल्याचे बोलले जाते. मात्र याबाबतचा खुलासा खुद्द श्रियाने केला आहे. 

तिने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'लोकांना वाटते की, मला मराठी चित्रपटात काम करण्यात रस नाही. मात्र यात अजिबात तथ्य नाही. मराठी चित्रपट माझ्यासाठी खूप जवळचा आहे. माझ्या करियरची सुरूवात मी मराठी चित्रपटसृष्टीतून केली आहे. 'एकुलती एक' हा माझा पहिला चित्रपट आहे. मला वाटते की, दिवसेंदिवस मराठी सिनेइंडस्ट्री आपला विस्तार वाढवत आहे. अद्याप मी कोणतीही मराठी चित्रपटाची स्क्रीप्ट निवडली नाही. पण, मला आशा आहे की यावर्षी मी मराठी सिनेमात काम करेन.'

श्रिया पिळगावकरने शाहरूख खानसोबत 'फॅन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनुभव सिन्हाचा आगामी चित्रपट 'अभी तो पार्टी शुरू हुई है' आणि गुरींदर चड्ढाचा ब्रिटीश पीरिएड ड्रामा 'बीचम हाऊस'मध्ये श्रिया पाहायला मिळणार आहे. इतकेच नाही तर 'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्कीच्या जागी श्रियाची वर्णी लागली आहे. या चित्रपटातून ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रिया पिळगावकरने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, २०१९ वर्षाची सुरूवात खूप चांगली झाली असून मी हाथी मेरे साथी चित्रपटात राणा दुग्गाबतीसोबत दिसणार आहे. या चित्रपटात काम करायला मजा येणार आहे आणि या चित्रपटाचा विषय खूप चांगला आहे. माझ्यासाठी हा चित्रपट खूप खास असून पहिल्यांदाच मी त्रिभाषिक चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटातून तमीळ व तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे.

टॅग्स :श्रिया पिळगावकरराणा दग्गुबतीशाहरुख खान