Join us  

मी काम करणार नाही, श्रद्धालाही करू देणार नाही! वाचा, शक्ती कपूर असे का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 4:23 PM

श्रद्धा कपूरला काम नाही करू देणार पापा शक्ती कपूर, जाणून घ्या काय आहे कारण

ठळक मुद्देमी माझ्या अनेक मित्रांनाही शूटींग न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण बाहेर स्थिती खूप गंभीर आहे, असेही ते म्हणाले.

कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. आता मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जात आहे. शिवाय अनलॉक-1सोबत देश हळूहळू पूर्वपदावर येतोय. येत्या काही दिवसांत फिल्म इंडस्ट्रीचे कामही सुरु होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात फिल्म इंडस्ट्री ठप्प पडली होती. आता शूटींग सुरु होणार म्हटल्यावर एकीकडे फिल्म इंडस्ट्रीत आनंदाचे वातावरण आहे. पण दुसरीकडे अभिनेत्री श्रद्धा कपूरचे घरचे मात्र चिंतेत आहे. विशेषत: श्रद्धा कपूरचे पापा शक्ती कपूर कमालीचे चिंतीत आहे. काहीही झाले तरी सध्या तरी मी माझ्या मुलीला शूटींगची परवानगी देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टाइम्स ग्रूपला दिलेल्या मुलाखतीत शक्ती कपूर यांनी आपली ही भूमिका मांडली. सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे, हे खरे असले तरी सध्याच्या स्थितीत मी तरी बाहेर पडणार नाहीये. कामही करणार नाहीये. केवळ मीच नाही तर मी श्रद्धाला सुद्धा काम करण्याची परवानगी देणार नाही. माझ्या मते धोका कमी झालेला नाही. स्थिती आणखी बिघडू शकते, परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असे मला जाणवतेय. काम महत्त्वाचे आहे, हे मला ठाऊक आहे. पण कामापेक्षा जीव महत्त्वाचा आहे. कामाला जीवापेक्षा अधिक महत्त्व दिले जाऊ शकत नाही, असे शक्ती कपूर म्हणाले.

शूटींग सुरु झाल्यास परिस्थिती आणखी खराब होईल. मी माझ्या अनेक मित्रांनाही शूटींग न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण बाहेर स्थिती खूप गंभीर आहे, असेही ते म्हणाले.शक्ती कपूर यांची काळजी वाजवी आहे. शेवटी श्रद्धा अभिनेत्री असली तरी सर्वप्रथम ती त्यांची मुलगी आहे. यामुळे मुलीचा जीव ते कुठल्याही स्थितीत धोक्यात घालू इच्छित नाही.

टॅग्स :शक्ती कपूरश्रद्धा कपूर