शाहरूख-सलमान दुबईत एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 11:24 IST
सध्या संपूर्ण बॉलीवूड जगत ‘तोईफा २०१६’ या अॅवॉर्ड फंक्शनमध्ये अवतरले आहे. बॉलीवूडमधील फेव्हरेट सुपरस्टार जरी असेल तरी शाहरूख खान ...
शाहरूख-सलमान दुबईत एकत्र?
सध्या संपूर्ण बॉलीवूड जगत ‘तोईफा २०१६’ या अॅवॉर्ड फंक्शनमध्ये अवतरले आहे. बॉलीवूडमधील फेव्हरेट सुपरस्टार जरी असेल तरी शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यात वैमनस्य आहे हे आता सर्वांनाच माहिती आहे. पण ते दुबईत फंक्शनसाठी आले असून ते एकमेकांसोबत चक्क गप्पा मारत आहेत, हसत आहेत.स्टेज परफॉर्मन्सचा सराव करतांना रिहर्सलच्या दरम्यान थोडा निवांत वेळ मिळाला की ते सर्वसामान्य मित्रांप्रमाणे गप्पा मारताना दिसत आहेत. शाहरूख आणि सलमान यांचे ‘रईस’ आणि ‘सुल्तान’ हे दोन्ही चित्रपट ईदला रिलीज होणार आहेत. चित्रपटांच्या संघर्षापासून स्वत:चे वैयक्तिक आयुष्य कसे दुर ठेवायचे हे त्या दोघांना उत्तमप्रकारे माहिती आहे.