शाहरूख खानच्या ‘झीरो’ला साउथचा ‘हा’ सुपरस्टार देत आहे टक्कर, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 15:55 IST
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याचा ‘झीरो’ हा चित्रपट रिलीज झाला असून, त्यास साउथचा हा सुपरस्टार टक्कर देताना दिसत आहे. पाहा व्हिडीओ!
शाहरूख खानच्या ‘झीरो’ला साउथचा ‘हा’ सुपरस्टार देत आहे टक्कर, पाहा व्हिडीओ!
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्या आगामी ‘झीरो’चे टीजर रिलीज करण्यात आले असून, शाहरूखच्या बुटक्या व्यक्तीची भूमिका पसंत केली जात आहे. मात्र शाहरूखच्या ‘झीरो’ला साउथच्या अलू अर्जुन हा सुपरस्टार कडवी टक्कर देताना दिसत आहे. यू-ट्यूबवर दोघांच्या चित्रपटांच्या टीजरची फाइट बघावयास मिळत आहे. अलू अर्जुन याच्या Naa Peru Surya Naa Illu India (ना पेरू सूर्या ना इल्लू) या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. याचा अर्थ ‘माझे नाव सूर्या आहे, भारत माझे घर आहे’ असा होता. तर शाहरूखच्या ‘झीरो’चीही धूम यू-ट्यूबवर बघावयास मिळत आहे. दरम्यान, अलू अर्जुन याच्या बहुतांश चित्रपटात जबरदस्त अॅक्शन दाखविली जात असल्याने हाही चित्रपट त्याच अनुषंगाने आहे. टीजरमध्ये त्याची झलक बघावयास मिळत असून, अलू अर्जुन शाहरूखला टक्कर देताना दिसत आहे. ‘ना पेरू सूर्या ना इल्लू’ या चित्रपटात अलू अर्जुन सैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे. अतिशय रागीट असा कंमाडो म्हणून त्याला दाखविण्यात आले आहे. आपल्या मायभूमीसाठी दुश्मनाचा बीमोड करणारा अलू जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. अलू अर्जुनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन वकंतम वामसी यांनी केले आहे. दिग्दर्शक म्हणून ते या चित्रपटातून डेब्यू करीत आहेत. या अगोदर ते कथाकार म्हणून काम करीत असत. चित्रपटात अनु इमेनुअल मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत असून, शरतकुमार खलनायकाच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. हा चित्रपट २७ एप्रिलला रिलीज होणार आहे. म्हणजेच अलू अर्जुनचा हा चित्रपट सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘२.०’चा मुकाबला करताना दिसणार आहे. दरम्यान, २०१७ मध्ये अलू अर्जुनचा ‘दुवदा जगन्नाधम (डीजे)’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगलीच धूम उडवून दिली होती. ५० कोटी रुपये बजेट असलेला हा तेलगू चित्रपट २३ जून रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर सुमारे ११५ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता वर्षाच्या सुरुवातीलाच अनू अर्जुनने धमाका केला असून, त्याचा हा चित्रपट जबरदस्त हिट ठरेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.