Join us

​शाहरुख खानच्या ‘रईस’चा जबरदस्त डॉयलॉग प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 21:48 IST

Raees released a dialogue promo ; ‘बनिया का दिमाग और मियाभाई का डेरिंग’ या टॅग लाईनचा वापर क रण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये शाहरुखचा लूक आकर्षक असून डोळ्यांना सुरमा, पठाणी पेहराव आणि जबरदस्त संवादांमुळे हा प्रोमो जोरदार ठरतो आहे.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘रईस’ या चित्रपटाचा डॉयलॉग प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमधून ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रमोशनपासून चर्चेत असलेले ‘बनिया का दिमाग और मियाभाई का डेरिंग’ या टॅग लाईनचा वापर क रण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये शाहरुखचा लूक आकर्षक असून डोळ्यांना सुरमा, पठाणी पेहराव आणि जबरदस्त संवादांमुळे हा प्रोमो जोरदार ठरतो आहे. ‘रईस’ या चित्रपटात अवैध व्यवसायात गुंतलेल्या एका व्यक्तीच्या भूमिक ा शाहरुख साकारत आहे. या प्रोमोच्या माध्यमातून ‘रईस’च्या स्वत:चा धंदा कसा सुरू करून तो कसा वाढवितो हे दाखविण्यात आले आहे. धंदा सुरु करण्यासाठी पाठबळाची नाही तर हिंमतीची गरज असते, अशा पद्धतीची वाक्ये शाहरुख या प्रोमोमध्ये आहे. ‘रईस’ या चित्रपटातील गाणी चांगलीच हिट ठरली आहे. सनी लिओनवर चित्रीत करण्यात आलेले लैला मैं लैला हे गाणे यु-ट्युबवर पाहिल्या जाणाºया सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडीओ ठरला आहे. या शिवाय या चित्रपटातील ‘उडी उडी जाये’ या गाण्यात शाहरुख खान प्रथमच पडद्यावर ‘गरबा’ खेळताना दिसते. शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आलेल्या या गाण्यातून गुजरातमधील संक्रातीचा उत्साह दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यात पतंग उडविण्याचे देखील काही सिन्स टाकण्यात आले आहे. या शिवाय या चित्रपटाचे ‘ओ जालिमा’ हे अरिजीत सिंगच्या आवाजातील गाणे चांगलेच पसंत केल जात आहे. शाहरुख खानच्या या रईसमध्ये शाहरुख सोबत पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, नवाजुद्दीन सिद्दिकी, अतुल कुळकर्णी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.  रईस हा चित्रपट हृतिक रोशनच्या काबिल या चित्रपटबरोबर म्हणजेच २५ जानेवारीला प्रदर्शित केला जाणार आहे.