शाहरुख खानचा बेस्ट फ्रेंड करीम मोरानीवर बलात्काराचा आरोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 18:19 IST
शाहरुख खानचा जवळचा मित्र आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ व ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटांचा निर्माता करीम मोरानीवर एका तरुणीने बलात्काराचा ...
शाहरुख खानचा बेस्ट फ्रेंड करीम मोरानीवर बलात्काराचा आरोप!
शाहरुख खानचा जवळचा मित्र आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ व ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटांचा निर्माता करीम मोरानीवर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. हैदराबाद येथे पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार करीम मोरानीने या मुलीवर अनेक वेळा बलात्कार असून तिची नग्न चित्रफित काढून तिला ब्लॅकमेल करत गप्प राहण्याची धमकी दिली.विशेष म्हणजे तक्रारदार तरुणी मोरानी यांची मुलगी झोआची मैत्रीण असून त्या दोघींनी नाटकांत एकत्र काम केलेले आहे. त्यातूनच तिची आणि मोरानीची ओळख झाली. हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरानीने या मुलीचा लैंगिक छळ केला असून अनेकदा बलात्कार केला आहे. मुंबईच्या एका नावाजलेल्या फिल्म स्टुडिओमध्येसुद्धा सप्टेंबर-आॅक्टोबर २०१५ या काळाच्या दरम्यान त्याने तिच्यावर दोनदा बलात्कार केला होता.एवढेच नाही तर मोरानीने तिची नग्न चित्रफित आणि फोटो त्याच्या मोबाईलवर काढून ते इतरांशी शेअर करण्याची धमकीदेखील दिली. त्यामुळे आपण इतके दिवस गप्प बसल्याचे तक्रारदार मुलीने सांगितले. म्हणून तर तिने मुंबईऐवजी हैदराबादेत तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला. कारण तिला भीती होती की, मुंबईत मोरानी वजन वापरून ही केस बंद पाडेल. द मोरानी कनेक्शन:करीम मोरानी, मनीष मल्होत्रा आणि शाहरुख खानमोरानी यांच्या प्रवक्त्याकडून जाहीर करण्यात आलेल्या स्टेटमेंटमध्ये हे सर्व आरोप फेटाळण्यात आले असून हा केवळ त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. ‘मोरानी यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून केवळ त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहचविण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. आम्ही कायद्याचा आधारत घेत हे आरोप कसे खोटे आहेत हे सिद्ध करू. मोरानी निर्दोष असून कायदाव्यवस्थेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे.’करीम मोरानीला इंडस्ट्रीमध्ये शाहरुखचा जवळचा मित्र मानण्यात येते. शाहरुखसोबत मिळून त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. यापूर्वी अनेक वेळा मोरानीवर आरोप झालेले असून अंडरवर्ल्डकडून त्याला मृत्यूची धमकीसुद्धा देण्यात आली होती. ‘२-जी’ घोटाळ्यातही त्याचे नाव अडकलेले आहे.READ ALSO: शाहरूख खानने बदलले मुंबईच्या चर्मकाराचे आयुष्य!