Join us  

अखेर ‘बेगम’ गौरीने शाहरूख खानला दिली परवानगी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 11:58 AM

सुपरस्टार शाहरूख खान आणि गौरी खान यांची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. कॉलेजच्या दिवसांत शाहरूख आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि इथून पुढे दोघांनीही लग्न केले.

सुपरस्टार शाहरूख खान आणि गौरी खान यांची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. कॉलेजच्या दिवसांत शाहरूख आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि इथून पुढे दोघांनीही लग्न केले. लग्नानंतरच्या इतक्या वर्षांतील त्यांचे प्रेम जराही कमी झालेले नाही. गौरी खऱ्या अर्थाने शाहरूखची ‘बेगम’ आहे आणि कदाचित ‘बेगम’ला विचारल्याशिवाय ‘मन्नत’मधील पानही हलत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे, शाहरूखने शेअर केलेला फोटो. शाहरूखने इन्स्टाग्रामवर त्याचा आणि गौरीचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. फोटोत दोघांच्याही डोळ्यांवर काळा चष्मा आहे. दोघांनीही काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. या फोटोला त्याने दिलेले कॅप्शन मोठे मजेशीर आहे. होय, ‘अनेक वर्षांनंतर पत्नीने मला मी काढलेला हा फोटो अपलोड करण्याची परवानगी दिली आहे,’ असे कॅप्शन शाहरूखने या फोटोला दिले आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे, गौरीच्या परवागनीशिवाय शाहरूख काहीही करत नाही.

 दिल्लीत राहणाऱ्या शाहरुखने गौरीला १९८४ मध्ये एका पार्टीमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्हा तो फक्त १८ वर्षांचा आणि गौरी १४ वर्षांची होती. त्यानंतर अनेकदा त्याने गौरीशी बोलण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनंतर अखेर त्याने तिचा फोन नंबर मिळवला आणि दोघांमध्ये संवाद सुरू झाला. हळूहळू मैत्री वाढू लागली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात व्हायला फार काळ लागला नाही.शाहरुख खान सुरुवातीला गौरीसाठी खूप पझेसिव्ह होता. तिने दुसऱ्या मुलांशी बोलणं, केस मोकळे सोडणं त्याला आवडायचं नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवरून तो गौरीशी भांडू लागला. यामुळे त्रस्त झालेल्या गौरीने त्याच्याशी अबोला धरला आणि काही दिवसांसाठी मैत्रिणींसोबत ती दिल्लीहून मुंबईला आली. शाहरुखला जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा गौरीसाठी तोसुद्धा मुंबईला आला. मुंबईतल्या अक्सा बीचवर पुन्हा एकदा या दोघांची भेट झाली आणि एकमेकांना पाहताचक्षणी दोघांनाही रडू कोसळलं. त्याच वेळी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :शाहरुख खान