Join us  

शाहरुख खानच्या 'डंकी' बद्दल मोठी अपडेट समोर, चाहत्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 4:17 PM

राजकुमार हिरानी दिग्दर्शित सिनेमात पहिल्यांदाच किंग खान झळकणार आहे.

'पठाण' आणि 'जवान' च्या यशानंतर शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी 'डंकी' (Dunki) सिनेमाची जोरदार चर्चा आहे. एकाच वर्षात तिसरा सुपरहिट सिनेमा देण्यासाठी शाहरुख सज्ज आहे. २१ डिसेंबर रोजी सिनेमा रिलीज होतोय. राजकुमार हिरानी दिग्दर्शित सिनेमात पहिल्यांदाच किंग खान झळकणार आहे. 'डंकी' चा टीझर तर चाहत्यांना प्रचंड आवडलाय. आता प्रतिक्षा आहे ती सिनेमाच्या ट्रेलरची. ७ डिसेंबर ला ट्रेलर रिलीज होणार होता. मात्र आता ट्रेलरची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असल्याची चर्चा आहे.

 'डंकी' म्हणजेच अनधिकृतपणे दुसऱ्या देशात प्रवेश करण्याची पद्धत यावर सिनेमा आधारित आहे. सिनेमात शाहरुख खानसोबतच तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इरानी यांचीही मुख्य भूमिका आहे. सिनेमाच्या टीझरमधून हे स्पष्ट होते की शाहरुख खान त्याच्या चार मित्रांना लंडनला जाण्यासाठी मदत करत असतो. मात्र त्यांना व्हिसा मिळत नाही. तेव्हा लंडनला जाण्याचं त्यांचं मिशन नेमकं कसं पूर्ण होतं की नाहीच होत हे सिनेमातून स्पष्ट होणार आहे.

'डंकी'सिनेमा एकूण 85 कोटी बजेटमध्ये बनला आहे. ७५ दिवसांमध्ये सिनेमाचं शूट पूर्ण झालं आहे. २१ डिसेंबरला सिनेमा प्रदर्शित होणार हे नक्की. मात्र ट्रेलरसाठी चाहत्यांना आणखी वाट बघावी लागणार आहे.

टॅग्स :डंकी' चित्रपटशाहरुख खानसिनेमा