Join us

बॉलिवूडमध्ये सर्वात ‘रईस’ ठरला शाहरूख खान; वाचा कमाई करणाºया टॉप १० कलाकारांची यादी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST

२०१७ मध्ये सर्वाधिक कमाई करणाºया टॉप १० बॉलिवूड कलाकारांची यादी फोर्ब्स साप्ताहिकाने जाहीर केली आहे. यादीमध्ये केवळ दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोपडा या दोनच अभिनेत्रींना स्थान मिळाले आहे. तर प्रथम क्रमांकावर बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याने त्याचे स्थान कायम ठेवले आहे. दीपिका १.१० कोटी डॉलरच्या कमाईसह सहाव्या क्रमांकावर आहे. तर प्रियंका आणि दीपिकाचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग एक कोटी डॉलरच्या कमाईसह सातव्या क्रमांकावर आहेत.

२०१७ मध्ये सर्वाधिक कमाई करणाºया टॉप १० बॉलिवूड कलाकारांची यादी फोर्ब्स साप्ताहिकाने जाहीर केली आहे. यादीमध्ये केवळ दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोपडा या दोनच अभिनेत्रींना स्थान मिळाले आहे. तर प्रथम क्रमांकावर बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याने त्याचे स्थान कायम ठेवले आहे. दीपिका १.१० कोटी डॉलरच्या कमाईसह सहाव्या क्रमांकावर आहे. तर प्रियंका आणि दीपिकाचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग एक कोटी डॉलरच्या कमाईसह सातव्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार शाहरूखने सलमान खान, अक्षय कुमार आणि आमीर खान यांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. १ जून २०१६ ते १ जून २०१७ दरम्यान त्याची कमाई ३.८ कोटी डॉलर इतकी आहे.सलमान खान शाहरूखच्या तुलनेत फारसा मागे नाही. या यादीत सलमान ३.७ कोटी डॉलरच्या कमाईसह दुसºया स्थानावर आहे.सलमान खाननंतर बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार ३.५५ कोटी डॉलरच्या कमाईसह तिसºया क्रमांकावर आहे.बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खान मात्र १.२५ कोटी डॉलरच्या कमाईसह चौथ्या क्रमांकावर आहे.हृतिक रोशनलाही या यादीत पाचवे स्थान मिळाले असून, त्याची कमाई १.१५ कोटी डॉलर इतकी आहे.तर मेगास्टार अमिताभ बच्चन ९० लाख डॉलर आणि रणबीर कपूर ८५ लाख डॉलरच्या कमाईसह अनुक्रमे ९ आणि १० स्थानावर आहेत.