पुणेकरांसोबत शाहरुख खानने धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 15:52 IST
सध्या शाहरूख खानच्या रईस या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगत आहे. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरदेखील चांगली कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ...
पुणेकरांसोबत शाहरुख खानने धरला ठेका
सध्या शाहरूख खानच्या रईस या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगत आहे. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरदेखील चांगली कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ही बॉलिवुडचा हा तगडा कलाकार मोठया उत्साहाने चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटातील गाणेदेखील प्रेक्षकांचे मनं जिंकत आहे. तसेच या चित्रपटातील डायलॉगने तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरूख खान पुणे येथे आला होता. अक्षरश: त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उडाली होती. तसेच त्याचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये क्लिक करता यावा यासाठी प्रेक्षकांचे मोबाईलदेखील सरसावले होते. तसेच पुण्यातील एका कॉलेजमध्ये किंग खान चाहत्यांसोबत जालिमा या गाण्यावर थिरकताना दिसला. तसेच तो आपली सिग्नेचर पोझ देण्यासदेखील विसरला नाही. या महाविदयालयातील विदयार्थ्याबरोबर त्याने खास या चित्रपटातील डायलॉगदेखील बोलून दाखविले. तसेच डॉन, जब तक है जान, दिलवाले दुल्हनिया ले जायेंग या चित्रपटातील डायलॉगनेदेखील विदयार्थ्याचे मनं त्याने जिंकले. त्याच्या या प्रत्येक स्टाईलवर विदयार्थ्यानी फुल कल्ला केला असल्याचे पाहायला मिळाले. तसेच तो प्रमोशनसाठी एका मॉलमध्येदेखील गेला होता. मॉलमध्ये त्याच्या चहात्यांनी तर त्याला गराडाचा घातला होता. मॉलमध्ये चाहत्यांची इतकी गर्दी पाहून किंग खानला ही या चाहत्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. एक्सेल एण्टरटेनमेन्ट या प्रोडक्शन हाऊसने ट्विटरवर त्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओला सोशलमीडियावर प्रचंड पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. रईस या चित्रपटात शाहरुखसोबत नवाझुद्दीन सिद्दीकी, माहिरा खान आणि मोहम्मद झेशन अयुब यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.