Join us  

​‘या’ अटीवर शाहरूख खानला मिळाला पहिला ब्रेक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 8:31 AM

बॉलिवूडला शाहरूख खान नावाचा सुपरस्टार देणारे अभिनेते व दिग्दर्शक लेख टंडन यांचे गत रविवारी(१५ आॅक्टोबर) निधन झाले. शाहरूख नावाचा ...

बॉलिवूडला शाहरूख खान नावाचा सुपरस्टार देणारे अभिनेते व दिग्दर्शक लेख टंडन यांचे गत रविवारी(१५ आॅक्टोबर) निधन झाले. शाहरूख नावाचा तरूण आज बॉलिवूडचा ‘किंगखान’ म्हणून ओळखला जातोय, ते केवळ लेख टंडन यांच्यामुळे.  अर्थात शाहरूखचा प्रचंड संघर्षही यामागे आहे. पण तरिही शाहरूख आज बॉलिवूडमध्ये आहे, याचे सगळे श्रेय लेख टंडन यांना जाते. टंडन यांनी शाहरूखला पाहिले आणि पहिल्याच नजरेत त्यांनी त्याच्यातील अभिनेत्याचे गुण हेरले. अर्थात यासाठी शाहरूखला लेख टंडन यांची एक अट मानावी लागली.   एका अटीवर लेख टंडन यांनी शाहरूखला ब्रेक दिला. ही अट कुठली तर केस कापायची.होय, खुद्द लेख टंडन यांनी राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले होते. शाहरूख पहिल्यांदा लेख टंडन यांना भेटला तेव्हा त्याचे केस बरेच लांब होते. लेख टंडन यांनी आपल्या मुलाखती सांगितले होते की, अंशीच्या दशकात मी दिल्लीत एका टीव्ही सीरिअलचे शूट करत होतो. याचवेळी एक तरूण सेटवर कुणाला तरी सोडायला आला. त्याचे केस बरेच लांब होते. मी त्याला पाहिले अन् त्याला थांबवले.   माझ्यासोबत काम करशील का? असा थेट प्रश्न मी त्याला केला. पण माझ्यासोबत काम करण्यासाठी तुला तुझे हे लांब केस कापावे लागतील, असेही मी त्याला म्हटलो. तो तरूण काही क्षण गांगरला. पण पुढच्याच क्षणाला तो बोलला. तुम्ही म्हणतायं म्हणून मी केस कापले अन् तुम्ही मला कामचं दिले नाही तर? असे त्याने मला विचारले. मी हसलो. तू केस काप. काम नक्की मिळेल, असे मी त्याला म्हणालो. माझ्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला अन् केस कापले. यानंतर माझ्या ‘दिल दरिया’ या टीव्ही सीरिअलमध्ये त्याने काम सुरु केले.पुढे लेख यांनी सांगितले की, शाहरूखने ‘दिल दरिया’मध्ये उत्तम काम केले. मी आणखी एका सीरिअलसाठी त्याचे नाव पुढे केले. ही सीरिअल होती, फौजी.  फौजीत शाहरूख दिसला आणि पुढे स्वत:च्या हिमतीवर त्याने बॉलिवूडचा प्रवास केला.ALSO READ: बॉलिवूडला शाहरूख खान सारखा ‘सुपरस्टार’ देणारे दिग्दर्शक लेख टंडन यांचे निधन