Join us  

'बाहुबली' लेखकच्या चित्रपटात दिसणार शाहरुख खान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 11:11 AM

बाहुबली चित्रपटाचे लेखन केल्यानंतर केवी विजेंद्र प्रसाद यांचे नाव प्रसिद्ध लेखकांच्या यादीत सामील झाले. प्रसाद यांनीच सलमान खानच्या बजरंगी ...

बाहुबली चित्रपटाचे लेखन केल्यानंतर केवी विजेंद्र प्रसाद यांचे नाव प्रसिद्ध लेखकांच्या यादीत सामील झाले. प्रसाद यांनीच सलमान खानच्या बजरंगी भाईजानचे कथासु्द्धा लिहिली आहे. तसेच त्यांनी बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतच्या मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसीची कथासुद्धा लिहिली आहे. आता या यादित आणखीन एक नाव सहभागी होणार आहे ते म्हणजे शाहरुख खानचे. मिळालेल्या माहितीनुसार विजेंद्र प्रसाद शाहरुख खानसाठी चित्रपटाची कथा लिहितायेत. मीडिया रिपोर्टनुसार प्रसाद यांनी शाहरुखला ध्यानात ठेवून चित्रपटाची कथा लिहिली आहे. यासंदर्भात त्यांनी शाहरुखची भेट सुद्धा घेतली. मुंबईतल्या एक प्रसिद्धा हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली. विजेंद्र प्रसाद यांनी कंगना राणौतच्या मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसीची कथासुद्धा लिहिली आहे, सूत्रांच्या माहितीनुसार विजेंद्र शाहरुखसाठी एक अॅक्शन चित्रपट लिहित आहेत. अजून शाहरुखने या चित्रपटासाठी होकर दिलेला नाही. सध्या तो झिरोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शाहरुखचा मागचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. त्यामुळे झिरो चित्रपटाकडून शाहरुखला खूप आशा आहेत.  ALSO RAED  :  आई गौरी खानवर का रागावला स्मार्टी अबराम?सध्या तो या चित्रपटाच्या तिसऱ्या शेड्यूलचे शूट करतो आहे. यात तो एका  बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे.  या चित्रपटातील  शाहरूखची  व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत. शाहरूखची कंपनी रेड चिलीज् व्हीएफएक्सकडे हे काम आहे.शाहरूखच्या या चित्रपटासाठी विदेशातून एक्सपर्ट बोलवले गेलेत, असेही कळतेय. आनंद एल राय यांच्या या चित्रपटात शाहरूख खानसोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ या दोघी मुख्य भूमिकेत आहेत. यंदा नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला ‘झिरो’ प्रदर्शित होणार आहे.  सध्या शाहरुख छोट्या पडद्यावरदेखील सक्रिय आहे. त्याचा टेड टॉक्स या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे.