Join us  

21 वर्षांपूर्वी थोडक्यात बचावली होती महिमा चौधरी, चेह-यात रूतून बसले होते 67 काचांचे तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 12:25 PM

महिमा चौधरीने सांगितल्या त्या भीषण अपघाताच्या आठवणी

ठळक मुद्दे1999 साली महिमा अजय देवगण व काजोलसोबत ‘दिल क्या करे’चे शूटींग करत होती. याचदरम्यान हा भीषण अपघात घडला होता.

23 वर्षांपूर्वी शाहरूख खानसोबत ‘परदेस’मधून डेब्यू करणारी अभिनेत्री महिमा चौधरी आज बॉलिवूडमध्ये गायब झाली आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला ‘डार्क चॉकलेट’ हा तिचा अखेरचा सिनेमा. त्यानंतर ती कुठल्याच सिनेमात झळकली नाही. महिमाचा डेब्यू सिनेमा खरे तर हिट होता. पण तरीही तिचे फिल्मी करिअर फार चालले नाही. करिअरच्या सुुरुवातीलाच महिमा एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावली होती.

 पिंकविला या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत महिमाने या भीषण अपघाताबद्दल सांगितले. तर 21 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 साली महिमा अजय देवगण व काजोलसोबत ‘दिल क्या करे’चे शूटींग करत होती. याचदरम्यान हा भीषण अपघात घडला होता. बेंगळुरूमध्ये स्टुडिओकडे निघाली असताना तिच्या कारला ट्रकने धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या काचेचे अनेक तुकडे महिमाच्या चेह-यावर रतून पडले होते.

महिमाने सांगितले, ‘त्या  अपघातातून मी मरता मरता वाचले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर, शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी जेव्हा आरशात पाहिले तेव्हा धक्काच बसला होता. डॉक्टरांनी माझ्या चेह-यात रूतून बसलेले 67 काचांचे तुकडे काढले होते. तो खूप भयानक अनुभव होता. अपघातानंतर बरेच दिवस मला घरीच राहावे लागले. कारण उजेडात, कॅमे-याच्या लाइटमध्ये जाण्यास बंदी होती. मी स्वत:ला आरशात पाहू शकत नव्हते. या अपघानंतर माझ्या करिअरलाही ब्रेक लागला.   माझ्या हातून चित्रपटांच्या ब-्याच ऑफर्स निघून गेल्या. अपघाताविषयी मी कोणाला फार काही सांगितले नाही. कारण चेहरा खराब झाला हे कळले तर लोक मला काम देणार नाहीत, ही भीती मला होती.

या अपघातातून महिमा चौधरी  बरी झाली तेव्हा नीना लुल्लाने मला ‘प्यार कोई खेल नहीं’ या चित्रपटात एक गाणे दिले.  अक्षय कुमारने तिला ‘धडकन’मध्ये संधी दिली. त्याकाळात मी लपतछपत वावरत होते,  या कठीण काळात कुटुंबीयांनी फार मदत  केल्याचेही तिने सांगितले

टॅग्स :महिमा चौधरी