Join us

शाहरुख-कंगणाची जोडी एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:38 IST

कंगणा राणावत हिच्या 'तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्‍स' चित्रपटापासून तिच्या करिअरला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. पण, तिच्याबाबतीत आणखी एक बाब ...

कंगणा राणावत हिच्या 'तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्‍स' चित्रपटापासून तिच्या करिअरला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. पण, तिच्याबाबतीत आणखी एक बाब महत्त्वाची वाटते ती अशी की, तिने आत्तापर्यंत एकाही खानसोबत काम केलेले नाही. किंवा काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली नाही. नुकत्याच कळालेल्या माहितीनुसार, कंगणा राणावत ही शाहरूख खानसोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे. आनंद एल राय हे शाहरूखला घेऊन एक चित्रपट बनवताहेत पण, अद्याप त्याविषयी काहीही निश्‍चित नाही. असे वाटते की, ' ही अफवा नक्की खरी व्हावी. कारण, एका खानसोबत तरी कंगणाने काम करायला हवे.'