Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘पद्मावती’साठी शाहीदच्या दोन अटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 16:26 IST

‘बाजीराव मस्तानी’नंतर संजय लीला भन्साळी ‘पद्मावती’ हा नवा महत्त्वाकांक्षी चित्रपट घेऊन येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ‘पद्मावती’च्या स्टारकास्टची चर्चा ...

‘बाजीराव मस्तानी’नंतर संजय लीला भन्साळी ‘पद्मावती’ हा नवा महत्त्वाकांक्षी चित्रपट घेऊन येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ‘पद्मावती’च्या स्टारकास्टची चर्चा सुरु आहे. ‘पद्मावती’साठी दीपिका पादुकोण हिचे नाव ठरले. अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी रणवीर सिंह याचे नाव फायनल झाले. मात्र ‘पद्मावती’चा पती राजा रतन रावल सिंह याची भूमिका कोण साकारणार, यावरून स्टारकास्टची निवड रखडली. या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांची नावे समोर आलीत. यापैकी अनेकांनी स्वत:हून ही भूमिका नाकारली तर काहींना दीपिकाने नकार दिला. अखेर हा शोध शाहीद कपूरच्या नावापर्यंत येऊन थांबला. पण सहजासहजी नाही तर या भूमिकेसाठी होकार देण्याआधी शाहीदने दोन अटी ठेवल्या. शाहीद नुकताच बाप बनला आहे, हे तर तुम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे तो आपला पूर्ण वेळ त्याच्या चिमुकलीला देऊ इच्छितो. केवळ याचमुळे ‘माझ्या सीक्वेंसची शूटींग मी काही महिन्यानंतर करेल’,अशी पहिली अट शाहीदने ठेवली. त्याची दुसरी अट होती, ‘पद्मावती’च्या स्क्रीप्टमध्ये बदलाची. होय, शाहीदला ‘पद्मावती’त रणवीर एवढीच स्क्रीन स्पेस हवी आहे. त्यामुळे शाहीद स्क्रीप्टमध्ये काही बदल करण्याच्या अटीवर अडून बसला.   भन्साळींनी शाहीदच्या या दोन्ही अटी मान्य केल्याचे कळते. एकंदर काय तर रणवीरपेक्षा स्वत:ची भूमिका कुठेही उणी ठरू नये, याची काळजी शाहीद घेतोय...वेल डन शाहीद!!