Join us

‘या’ दोघींसोबत शाहिदने शेअर केला त्याचा अ‍ॅवॉर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 14:49 IST

शाहिद कपूरला (क्रिटिक्स चॉईस) ‘उडता पंजाब’ चित्रपटासाठी ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चा अ‍ॅवॉर्ड मिळालाय. या सोहळ्यात त्याच्यासोबत त्याची पत्नी मीरा राजपूत ही होतीच.

शीर्षक वाचून गोंधळलात का? अभिनेता शाहिद कपूरच्या आयुष्यात त्या दोघी कोण? असे तुम्हाला नक्कीच वाटले असणार. ‘त्या’ दोघी म्हणजे पत्नी मीरा राजपूत आणि त्याला मिळालेल्या फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डवरील ‘ब्लॅक लेडी’ यांच्यासोबत. अलीकडेच पार पडलेल्या ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड फंक्शन’ मध्ये शाहिद कपूरला (क्रिटिक्स चॉईस) ‘उडता पंजाब’ चित्रपटासाठी ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चा अ‍ॅवॉर्ड मिळालाय. या सोहळ्यात त्याच्यासोबत त्याची पत्नी मीरा राजपूत ही होतीच. ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्स’ सोहळ्यात तिचा हा पहिलाच ‘रेड कार्पेट अ‍ॅपिअरन्स’ होता. शाहिद कपूर हा सध्या ‘पद्मावती’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. मात्र, त्याच्या ‘उडता पंजाब’ चित्रपटातील अभिनयामुळे समीक्षकांना देखील प्रभावित केले. त्याने केलेली रॉकस्टारची भूमिका ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यामुळे त्याला यंदाचा फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड (क्रिटिक्स चॉईस) मिळाला. त्याने हा अ‍ॅवॉर्ड त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर हिला प्रदान केला. तिच्यासोबतचा कारमधील एक फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत मीरा हातात ‘ब्लॅक लेडी’ अ‍ॅवॉर्ड घेऊन बसलेली दिसत आहे. ‘दोन महिलांसोबत हा अ‍ॅवॉर्ड मी शेअर करतो आहे. मी फिल्मफेअरचे आभार मानतो.’ शाहिद कपूर हा अभिनेता त्याला मिळालेली भूमिका अत्यंत गंभीरपणे साकारत असतो. त्यासाठी करावी लागणारी मेहनत तो घेत असतो. अलीकडेच त्याने ‘पद्मावती’ चित्रपटासाठी वजन वाढविले आहे. ‘उडता पंजाब’ साठी घटवलेले वजन त्याला आता या चित्रपटासाठी वाढवावे लागले आहे.