Join us

SHAHID KAPOOR'S PRE-BIRTHDAY PARTY: हातात हात घालून दिसले वरूण धवन अन् नताशा दलाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 13:24 IST

वरूण धवन याच्या आयुष्यात कुणीतरी आहे, हे आपण बºयाच दिवसांपासून ऐकत आहोत. होय, वरूण नताशा दलाल हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या ...

वरूण धवन याच्या आयुष्यात कुणीतरी आहे, हे आपण बºयाच दिवसांपासून ऐकत आहोत. होय, वरूण नताशा दलाल हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. आत्तापर्यंत वरूणने नताशसोबतचे संबंध लपवण्याचे आटोकाट प्रयत्न केलेत. पण अखेर लपून लपून किती लपवणार? कदाचित वरूणलाही हे कळून चुकले असावे. त्यामुळेच नताशासोबतचे नाते आणखी लपवायचे नाही, असे वरूणने ठरवून टाकले असावे. काल शाहिद कपूरच्या प्री-बर्थ डे पार्टीतील वरूण व नताशाचे फोटो पाहून तरी असेच वाटते. काल या पार्टीला वरूण आणि नताशा अगदी हातात हात घालून पोहोचले. वरूणने नताशाचा हात पकडला होता. पूर्णवेळ तो नताशाचा हात पकडून होता.अगदी अलीकडे म्हणजे व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी वरूण व नताशा वांद्रयातील एका रेस्टॉरंटमध्ये दिसले होते. काही दिवसांपूर्वी वरूण आलिया भट्ट हिच्यासोबत ‘कॉफी विद करण’मध्ये आला होता. यावेळी करणने वरूणला नताशाबाबत विचारले होते. यावेळी वरूणने नताशाही त्याची खूप जवळची मैत्रिण असल्याचे म्हटले होते. नताशा ही माझी खूप क्लोज फ्रेन्ड आहे. बालपणापासून आम्ही सोबत आहोत. आम्ही एकाच शाळेत शिकलो, असे वरूणने यावेळी सांगितले होते.आता वरूणने स्पष्टपणे नताशासोबतचे रिलेशन मान्य करत नसला तरी, त्याच्या वागण्यावरून आणि त्याच्या या फोटोंवरून तरी आपण अंदाज बांधूच शकतो. त्यामुळे वरूण आणि नताशा यांच्या मैत्रीपलीकडे काहीतरी शिजतेय, हे सांगायला आता कदाचित शब्दांची गरज उरलेली नाही.वरूण व आलिया भट्टचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. या पाठोपाठ वरूण ‘जुडवा2’मध्ये दिसणार आहे.