Join us  

शाहिद कपूर-श्रद्धा कपूरचा 'बत्ती गुल मीटर चालू' या दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 10:11 AM

शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर बत्ती गुल मीटर चालू सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती.

ठळक मुद्दे‘बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा वीज चोरीवर आधारित आहेयात अभिषेक बच्चनही लहानशा भूमिकेत दिसणार असल्याची खबर आहेदिग्दर्शक श्री नारायण सिंग यांना या सिनेमातून खूप अपेक्षा आहेत

शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर बत्ती गुल मीटर चालू सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. 21 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. याआधी हा सिनेमा गोकुळष्टमी रिलीज करण्याची तयारी सुरु होती मात्र मेकर्सनी शूटिंगला उशीर झालेल्यामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. नुकतेच या सिनेमाचे एक गाणं मुंबईत शूट करण्यात आले.  

सिनेमाचे बरेचसे शूटिंग उत्तराखंडमध्ये करण्यात आले आहे. ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा वीज चोरीवर आधारित आहे.  वीज कंपनीच्या पायऱ्या झिजवणाऱ्या सामान्य माणसाची कथा यात दिसणार असल्याचे कळते. यात अभिषेक बच्चनही लहानशा भूमिकेत दिसणार असल्याची खबर आहे. श्रद्धा यात लीड रोलमध्ये आहे. श्रद्धा एका खास पद्धतीच्या एक्सेंटमध्ये बोलताना दिसणार आहे. शाहिद आणि श्रद्धाने याआधी 'हैदर'मध्ये एकत्र दिसले होते. यामी गौतम यात वकिलाची भूमिका साकारणार आहे. यासाठी ती हिंदी साहित्यचा अभ्यास करते आहे. यामीने एका इंटरव्हु दरम्यान सांगितले होते की, ''पडद्यावर माझी भूमिका खूप मोठी नाही आहे मात्र यासाठी जी तयारी मी करते आहे ती जास्त इंटरेस्टिंग आहे. सध्या मी भाषेवर काम करते आहे आणि त्यासाठी मी हिंदी साहित्याची मदत घेते आहे. ''

दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांना या सिनेमातून खूप अपेक्षा आहेत. याआधी त्यांनी दिग्दर्शित केलेला 'टॉयलेट एक प्रेमकथा' सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंती उतरला होता. ऐवढेच नाही तर समीक्षकांदेखील या सिनेमाची स्तुती केली होती. 

टॅग्स :शाहिद कपूरश्रद्धा कपूर