Join us  

... म्हणून शाहिद कपूरने साईन केला होता ‘कबीर सिंग’, कियारा नाही तर ही बनणार होती ‘प्रीती’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 5:47 PM

कबीर व प्रीतीच्या लव्हस्टोरीने अनेकांना भुरळ घातली. सिनेमाची गाणीही तुफान गाजली. पण हा सिनेमा शाहिदने कुणामुळे स्वीकारला, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

ठळक मुद्देकबीर सिंग हा सिनेमा 68 कोटींच्या बजेटमध्ये बनून तयार झाला. या सिनेमाने कमावले ते 379 कोटी.

शाहिद कपूर (Shahid Kapoor)  व कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या ‘कबीर सिंग’ या सिनेमाच्या प्रदर्शनाला 2 वर्ष पूर्ण झालीत. (Two Years of Kabir Singh)  21 जून 2019 रोजी रिलीज झालेला हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. इतकेच नाही तर या सिनेमाने शाहिद कपूरच्या करिअरला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. क्यूट कियारा तर सर्वांची आवडती बनली. कबीर व प्रीतीच्या या चित्रपटातील लव्हस्टोरीने अनेकांना भुरळ घातली. सिनेमाची गाणीही तुफान गाजली. पण हा सिनेमा शाहिदने कुणामुळे स्वीकारला, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तर बायकोमुळे. 

होय, शाहिदच्या कबीर सिंग बनण्यामागे मीरा राजपूतचे (Mira Rajput) मोठे योगदान आहे. ‘कबीर सिंग’ला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाहिदने इन्स्टावर लाईव्ह सेशन केले. यादरम्यान त्याने खुद्द हा खुलासा केला. मीरानेच मला  या सिनेमात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. माझ्या लुकवरही ती वेळोवेळी प्रतिक्रिया द्यायची. फक्त तिच्याचमुळे ही भूमिका मी केली आणि हेच सत्य आहे, असे शाहिद म्हणाला.

आधी तारा सुतारिया बनणार होती प्रीती...

कबीर सिंगमध्ये प्रीतीच्या भूमिकेसाठी आधी तारा सुतारियाला साईन करण्यात आले होते, असा एक खुलासाही शाहिदने केला. चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना प्रीतीच्या भूमिकेसाठी आधीपासूनच कियारा हवी होती. ती त्यांची पहिली पसंत होती. पण काही कारणास्तव चर्चा फिस्कटली. अशात तारा सुतारियाला साईन करण्यात आले होते. तारा त्यावेळी ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ या तिच्या डेब्यू सिनेमात बिझी होती. त्यामुळे कबीर सिंग लांबत होता. अखेर मेकर्स पुन्हा एकदा कियाराकडे गेलेत आणि फायनली कियाराला घेऊन हा सिनेमा तयार झाला, असे शाहिदने सांगितले.कबीर सिंग हा सिनेमा 68 कोटींच्या बजेटमध्ये बनून तयार झाला. या सिनेमाने कमावले ते 379 कोटी. 2019 मधील बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून कबीर सिंगने विक्रम रचला.

टॅग्स :शाहिद कपूरकबीर सिंग