Join us  

मित्रांनो, मी एकदम ठणठणीत! कॅन्सरच्या अफवेनंतर शाहिद कपूरने केला खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 12:08 PM

अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यानंतर अभिनेता शाहिद कपूरला पोटाचा कॅन्सर असल्याच्या बातमीने अचानक खळबळ उडवून दिली होती. इरफान व सोनालीनंतर आणखी एक अभिनेता कॅन्सर या आजाराने त्रस्त असल्याची बातमी एका वेबसाईटने दिली होती.

ठळक मुद्देवेबसाईटने कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नसल्याने हा अभिनेता शाहिद कपूर आहे अशी चर्चा रंगली होती. एवढेच नव्हे तर शाहिद गेल्या कित्येक दिवसांपासून या आजारावर उपचार घेत असून त्यासाठी तो सध्या मुंबईच्या बाहेर गेला असल्याचे देखील म्हटले जात होते.

अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यानंतर अभिनेता शाहिद कपूरला पोटाचा कॅन्सर असल्याच्या बातमीने अचानक खळबळ उडवून दिली होती. इरफान व सोनालीनंतर आणखी एक अभिनेता कॅन्सर या आजाराने त्रस्त असल्याची बातमी एका वेबसाईटने दिली होती. या वेबसाईटने बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध डान्सर अभिनेत्याला कॅन्सर झाला असल्याचे त्यांच्या बातमीत म्हटले होते. वेबसाईटने कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नसल्याने हा अभिनेता शाहिद कपूर आहे अशी चर्चा रंगली होती. एवढेच नव्हे तर शाहिद गेल्या कित्येक दिवसांपासून या आजारावर उपचार घेत असून त्यासाठी तो सध्या मुंबईच्या बाहेर गेला असल्याचे देखील म्हटले जात होते. शाहिदच्या बाबतीत ही अफवा पसरल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी लगेच स्पष्टीकरण देत, या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले होते. केवळ इतकेच नाही या अफवांवर तीव्र संताप व्यक्त केला होता.  शाहिदला कॅन्सर झाला ही केवळ एक अफवा असून अशाप्रकारच्या अफवा पसरवण्यात कोणाला आनंद मिळतो हेच आम्हाला कळत नाहीये. शाहिद अगदी ठणठणीत असून सध्या तो त्याच्या एका कामासाठी दिल्लीला गेला आहे. तो लवकरच मंबईला परतणार असून अशाप्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे शाहिदच्या कुटुंबाने म्हटले होते.

 आता खुद्द शाहिदनेही यावर चुप्पी तोडत, सगळ्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘मित्रांनो, मी एकदम ठणठणीत आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका,’ असे ट्वीट  शाहिदने केले आहे. शाहिदच्या या ट्वीटनंतर त्याच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची अफवा ऋषी कपूर यांच्या बाबतीत देखील पसरवण्यात आली होती. ऋषी कपूर यांची तब्येत बरी नसल्याने ते अमेरिकेत उपचार घेत आहेत. अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी त्यांनीच सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आजारपणाविषयी त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते. पण ऋषी कपूर यांना नक्की काय झाले हे त्यांनी ट्वीट मध्ये सांगितले नसल्याने त्यांना कॅन्सर झाला असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

टॅग्स :शाहिद कपूर