Join us  

‘जर्सी’च्या रिमेकसाठी शाहिद कपूरला मिळाले 35 कोटी, काय आहे सत्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:31 PM

यंदा ‘कबीर सिंग’ सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा देणारा शाहिद कपूर सध्या डिमांडमध्ये आहे. मध्यंतरी शाहिदने फी दुप्पट केल्याची बातमी आली होती.

ठळक मुद्दे‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटातील मुख्य पात्राचे नाव अर्जुन होते. ही भूमिका दाक्षिणात्य अभिनेता नानीने केली होती.

यंदा ‘कबीर सिंग’ सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा देणारा शाहिद कपूर सध्या डिमांडमध्ये आहे. मध्यंतरी शाहिदने फी दुप्पट केल्याची बातमी आली होती. एका चित्रपटासाठी शाहिद 35 कोटी रूपये घेणार, असे या बातमीत म्हटले गेले होते. या बातमीने अनेकजण थक्क झाले होते. नुकतीच शाहिदने ‘जर्सी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट साऊथच्या ‘जर्सी’या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.

या चित्रपटाच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा शाहिदच्या फीची चर्चा जोरात आहे. ‘जर्सी’च्या रिमेकसाठी त्याने 35 कोटी रूपये मानधन घेतल्याचे मानले जात आहे. पण आता या बातमीची सत्यता समोर आली आहे. होय, चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, ‘जर्सी’ या साऊथच्या चित्रपटाचा एकूण बजेट 18 कोटी रूपये होता. यात लीड अ‍ॅक्टरच्या मानधनाचाही समावेश होता. अशात याच चित्रपटाच्या रिमेकसाठी मेकर्स शाहिद कपूरला 35 कोटी रूपये देतील, यात काहीही तथ्य नाही. ‘जर्सी’साठी शाहिदने 35 कोटी रूपये घेतल्याच्या बातम्या खोट्या आहेत.

‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटातील मुख्य पात्राचे नाव अर्जुन होते. ही भूमिका दाक्षिणात्य अभिनेता नानीने केली होती.  भारतीय क्रिकेट संघात सहभागी होण्यासाठी अर्जुनचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला होता. आता हिंदीत हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. ‘जर्सी’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची निर्मिती अल्लु अरविंद, अमन गिल आणि दिल राजू करणार आहेत. दिग्दर्शक गौथम हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.

टॅग्स :शाहिद कपूर