पद्मावतीनंतर शाहिद कपूर दिसणार या भूमिकेत ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 14:08 IST
अभिनेता शाहिद कपूर लवकरच रोशनी या चित्रपटात दिसणार आहे. टॉयलेट एक प्रेम कथाचे दिग्दर्शक श्री नारायण सिंग या चित्रपटाचे ...
पद्मावतीनंतर शाहिद कपूर दिसणार या भूमिकेत ?
अभिनेता शाहिद कपूर लवकरच रोशनी या चित्रपटात दिसणार आहे. टॉयलेट एक प्रेम कथाचे दिग्दर्शक श्री नारायण सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. याचित्रपटाचा टीजर 19 तारखेला रिलीज करणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत कॅटरिना कैफ दिसणार आहे. नारायण यांनी मिड डे दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. इथेच त्यांनी चित्रपटाचा टीजर रिलीज होण्याबाबत माहिती दिली. शाहिद कपूर या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारणार आहे. तसेच चित्रपटात अभिषेक बच्चन आणि कॅटरिना कैफची देखील मुख्य भूमिका आहे. कॅटरिना सध्या लॉस एंजेलिसला आहे. मात्र ती तिकडे जाण्यापूर्वी तिने चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली असल्याची माहिती मिळते. कॅटरिनाला या चित्रपटाची स्क्रिप्ट खूपच आवडल्याची समजते आहे. प्रेरणा अरोरा या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट वीजेच्या समस्येवर आधारित आहे. शाहिद कपूरचा पद्मावती चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. ‘पद्मावती’च्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूरने साकारलेला राजा रावल रतन सिंग, दीपिका पादुकोणने साकारलेली राणी पद्मावती आणि रणवीर सिंगने साकारलेला अलाऊद्दीन खिल्जी सगळेच प्रेक्षकांना मोहित करून गेले. पण त्यातही या सगळ्यांत भाव खावून गेला तो रणवीर सिंग. खरे तर ‘पद्मावती’च्या तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रणवीरच्या तोंडी एकही संवाद नाही. पण तरिही त्याचा दमदार अभिनयच सगळ्यांना वेड लावून गेला. सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीचा टायगर जिंदा है ख्रिसमध्ये रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानने या चित्रपटाची शूटिंग आबुधाबीमध्ये पूर्ण केली आहे. हा एक था टायगरला सीक्वल आहे. कॅटरिना आणि सलमानचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. तब्बल पाच वर्षांनंतर दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक आहेत. सलमान खान आणि कॅटरिनाच्या जोडीचा 'टायगर जिंदा है' कडून दोघांना ही खूप अपेक्षा आहेत. यानंतर ती १९८३ मध्ये भारताला क्रिकेटमध्ये वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या टीमवर आधारित चित्रपटात ती दिसणार आहे. यात ती कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिका साकारणार आहे.