Join us  

... आणि शाहिद कपूरने ट्विटरवर सोनम कपूरला विचारला हा खाजगी प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 5:51 PM

अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा यांसारख्या अनेक कलाकारांनी शाहिदचे अभिनंदन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. पण सोनमने शाहिदचे अभिनंदन केल्यानंतर शाहिदने तिला एक खूपच छान रिप्लाय दिला आहे. या रिप्लायची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

शाहिद कपूरच्या घरी नुकत्याच एका छोट्याशा पाहुण्याचे आगमन झाले आहे. शाहिदला सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील त्याचे अनेक मित्रमैत्रिणी शुभेच्छा देत आहेत. अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा यांसारख्या अनेक कलाकारांनी आपल्या या मित्राचे अभिनंदन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. पण सोनमने शाहिदचे अभिनंदन केल्यानंतर शाहिदने तिला एक खूपच छान रिप्लाय दिला आहे. या रिप्लायची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

सोनमने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, शाहीद आणि मीरा तुम्हाला दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या घरात एक छोटासा पाहुणा नुकताच आला आहे. मिशाला आता खेळायला भाऊ मिळाला आहे. या ट्वीटवर रिप्लाय देताना शाहिदने सोनमचे आभार मानले. पण त्याचसोबत तू कधी गोड बातमी देणार आहेस असे तिला विचारले.

शाहिद कपूरने काल सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या मुलाचे नाव सगळ्यांना सांगितले होते. त्याने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर एक ट्वीट केले होते. त्यात त्याने म्हटले होते की, झेन आमच्या आयुष्यात आल्याने आमचे कुटुंब आता पूर्ण झालेले आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या शुभेच्छांसाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. असेच प्रेम आमच्यावर करत राहा... लव्ह यू ऑल.

शाहिदच्या मुलाचे नाव त्याने झेन ठेवले असून त्याच्या मोठ्या मुलीचे नाव मीशा आहे. शाहिदच्या पत्नीचे नाव मीरा असून त्या दोघांचे लग्न ७ जुलै २०१५ ला झाले होते. एक वर्षानंतर २६ आॅगस्टला त्यांच्या घरी मीशाचा जन्म झाला. झेन हे त्यांचे दुसरे अपत्य आहे.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत या दोघांचे अरेंज मॅरेज झाले आहे. शाहिद आणि मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती. म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आधी तर मीरा कोण, याबाबत लोकांना उत्सुकता होती. यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते.  

टॅग्स :शाहिद कपूरसोनम कपूर