Join us  

iifa award शोमध्ये अशा प्रकारे उडवली गेली होती सुशांतची खिल्ली, व्हिडीओ पाहून चाहते भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 11:32 AM

सुशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर सुशांतने असे का केले? हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

सुशांत, म्हणजे शांत राहणारा माणूस आणि सुशांत सिंह राजपूत असाच होता, तो कमी बाेलायचा पण त्याचे काम त्याच्यापेक्षा जास्त बोलायचे. त्याच्या प्रत्येक चित्रपटात काही ना काही संदेश असायचा. तो हसतमुख जगणारा, सकारात्मक विचार करणारा अभिनेता होता. पण सुशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर सुशांतने असे का केले? हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

तुर्तास सुशांतच्या निधनानंतर त्याचे अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांतचा आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांचा संताप होत आहे. IIFA सारख्या प्रतिष्ठीत मानल्या जाणा-या या अवॉर्ड शोमधील हा व्हिडीओ आहे. विशेष म्हणजे सा-यांसमोर कशा प्रकारे सुशांतची खिल्ली उडवली जात आहे. याबाबतचा हा व्हिडीओ आहे. 

या व्हिडिओमध्ये शाहरुख आणि शाहिदने सुशांतसिंग राजपूतला स्टेजवर बोलावले आणि त्यांची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळते आहे. अशात सुशांतही या सगळ्या गोष्टी केवळ हसण्यावर नेत असल्याचे पाहायला मिळत आहे. उपस्थित ऑडियन्सही मस्त या गोष्टीचा आनंद घेत आहेत. मुळात अनेकदा ज्युनिअर कलाकारांसह पुरस्कार सोहळ्यांमध्ये विनोद करत त्यांच्यासह मस्ती करतानाचे आपण पाहतो. मात्र सुशांतच्या निधनानंतर हा व्हिडीओ समोर आल्यामुळे चाहत्यांचाही राग अनावर झाला आहे. चाहते या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रीया नोंदवत या गोष्टीचा जाहिर निषेधच करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

यावर भोजपुरी गायिका मालिनी अवस्थी यांनी म्हटले आहे की,अँकरिंगच्या नावाखाली मोठमोठ्या कलाकारांकडून नवोदित अभिनेत्यांना अशाप्रकारे अपमानित करणे योग्य आहे का ? असा सवाल उठवत नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतआयफा अॅवॉर्ड