Join us

मीशाच्या पहिल्या वाढदिवसासाठी शाहिद कपूर आणि मीरा राजपूत लंडनला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 16:52 IST

शाहिद कपूर आपली पत्नी मीरा राजपूत आणि मुलगी मीशासोबत लंडनला रवाना झाला आहे. येत्या 26 ऑगस्टला शाहिदची मुलगी मिशा ...

शाहिद कपूर आपली पत्नी मीरा राजपूत आणि मुलगी मीशासोबत लंडनला रवाना झाला आहे. येत्या 26 ऑगस्टला शाहिदची मुलगी मिशा एक वर्षांची होणार आहे. त्याच्या पहिल्या बर्थ डे ला घेऊन शाहिद आणि मीरा खूपच उत्साहित आहेत. नुकताच शाहिदने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता ज्यात त्यांनी फॅमिलीसोबत व्हेकेशनवर जात असल्याचे म्हटले आहे. या फोटोत त्याच्यासोबत मुलगी मीशासुद्धा दिसत आहते. मीशा आई मीराच्या खाद्यांवर झोपलेली आहे. सध्या शाहिद पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे फॅमिलाला वेळ देणे त्याला शक्य होत नाही आहे. मात्र मुलीच्या पहिल्या बर्थ डे खास बनवण्यासाठी त्यांने हा वेळ काढला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मीरा मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचे प्लॅनिंग करत होती. त्यामुळे हा पहिला बर्थ डे शाहिद आणि मीरासाठी खास असणार हे काही वेगळे सांगायला नको. काही दिवसांपूर्वीच शाहिदने मीशाचा पहिला वाढदिवस परदेशात साजरा करणार असल्याचे सांगितले होते.न्यूयॉर्कमध्ये झालेल्या IIFA अॅवॉर्ड 2017 मध्ये ही शाहिद मीरा आणि मीशाला घेऊन गेला होता. शाहिद नेहमीच इन्स्टाग्रामवर मीशासोबतचे व्हिडीओ शेअर करत असतो. शाहिदने सध्या संजय लीला भंसालीच्या पद्मावती चित्रपटा व्यतिरिक्त कोणताच चित्रपट साईन केला नाही आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो विशाल भारव्दाजच्या रोमाँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. याबाबत शाहिदला विचारले असता तो म्हणाला सध्या मी फक्त पद्मावतीवरच लक्षकेंद्रीत केले आहे.