Join us

​भन्साळींच्या चित्रपटात शाहरूख-रणवीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 22:02 IST

‘बाजीराव मस्तानी’नंतर नॅशनल अवार्ड विनिंग डायरेक्टर संजय लीला भन्साळी यांचा नेक्स्ड प्रोजेक्ट काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ...

‘बाजीराव मस्तानी’नंतर नॅशनल अवार्ड विनिंग डायरेक्टर संजय लीला भन्साळी यांचा नेक्स्ड प्रोजेक्ट काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण आता पडदा हटला आहे. भन्साळी यांनी अलीकडे दिलेल्या पार्टीत शाहरूख खान दिसला होता. त्यानंतर लगेच भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टमध्ये शाहरूख दिसणार असल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे शाहरूखचे चाहते नक्कीच खूश झाले होते. पण आता पुढची बातमी वाचाल तर सोने पे सुहागा...असेच तुम्ही म्हणाल. कारण भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टमध्ये शाहरूख तर आहेच पण त्यासोबतच भन्साळींचा आॅल टाईम फेवरेट रणवीर सिंग हाही दिसणार आहे म्हणे...म्हणजे शाहरूख-रणवीर एकत्र आणि तेही भन्साळींच्या चित्रपटातत...आहे ना मज्जा...