शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खानचा ग्लॅमरस अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST
शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आहे. हा फोटो तिच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सुहाना स्वीमिंग पूलमध्ये दिसतेय.
शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खानचा ग्लॅमरस अंदाज!
शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आहे. हा फोटो तिच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सुहाना स्वीमिंग पूलमध्ये दिसतेय.सुहाना अद्याप बॉलिवूडमध्ये यायचीय. पण बॉलिवूडमध्ये येण्याआधीच ती स्टार झालीय. आजकाल सुहाना जिथे कुठे जाईल, तिथे कॅमेरे तिच्यावर रोखले जातात. काही दिवसांपूर्वी सुहाना पापा शाहरूख खानसोबत एका मोठ्या रेस्त्रां लॉन्चला पोहोचली होती. सध्या सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा आहे. करण जोहर सुहानाला अॅक्टिंग टीप्स देत असल्याचे ऐकिवात आहे. सुहाना व शाहरूखचा एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो मध्यंतरी खूपच गाजला होता. सुहाना खान हीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.