Join us  

शाहरूख खानची लेक सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये राहते या आलिशान घरात, पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 11:54 AM

सुहाना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. सुहाना खानने आपल्या घराची झलक इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून शेअर करत असते.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नसले तरी फॅन फॉलोव्हिंगच्या बाबतीत ती भल्याभल्यांना टक्कर देते. सुहाना सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सुहानाने सोशल मीडियावर आपले फोटो नेहमीच पोस्ट करत असते. चाहत्यांना तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावदेखील करत असतात. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये राहते. नुकतेच तिने आपल्या न्यूयॉर्कमधील आलिशान घराचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सुहाना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. सुहाना खानने आपल्या घराची झलक इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून शेअर करत असते. 

सुहानाने काही फोटोत आलिशान अपार्टमेंटचा एक भाग दाखवला आहे. ज्यामध्ये सूर्यास्त खूप सुंदर दिसत आहे. या फोटोत सुहाना खूप सुंदर दिसत आहे. त्यामध्ये 'घर' असा इमोजी शेअर केला आहे. 

शाहरुखची लेक सुहान पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड फॅनफॉलोईंग आहे.

सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे.2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती. कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते.

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान