शाहरूख खान- अनुष्का शर्माच्या सिनेमाचा फोटो लीक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 12:10 IST
शाहरूख खान व अनुष्का शर्मा या जोडीचा आॅनस्क्रीन रोमान्स लवकरच आपण पाहणार आहोत. इम्तियाज अलीच्या या चित्रपटाची सध्या सगळेच ...
शाहरूख खान- अनुष्का शर्माच्या सिनेमाचा फोटो लीक!
शाहरूख खान व अनुष्का शर्मा या जोडीचा आॅनस्क्रीन रोमान्स लवकरच आपण पाहणार आहोत. इम्तियाज अलीच्या या चित्रपटाची सध्या सगळेच आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण सध्या या चित्रपटाबद्दल नवे काही सांगायचे तर, या चित्रपटाचा एक फोटो लीक झाला आहे. यात शाहरूख खानच्या डोक्यावर पगडी दिसतेय. म्हणजेच शाहरूख पंजाबी लूकमध्ये दिसतो आहे. तर अनुष्का पंजाबी कुडी बनलेली आहे. चित्रपटाचे शूटींग पंजाबमध्ये सुरु असल्याचे या फोटोवरून कळतेय. येत्या आॅगस्ट महिन्यात आपणा सर्वांच्या भेटीस येणाºया या चित्रपटाचे ८० टक्के शूटींग झाले आहे. अर्थात अद्याप चित्रपटाचे नाव निश्चित झालेले नाही. आधी या चित्रपटासाठी ‘द रिंग’ हे नाव ठरले. यानंतर हे नाव बदलून ‘रहनुमा’ असे नवे नामकरण करण्यात आल्याचेही कानावर आले. ‘जब वुई मेट’, ‘रॉकस्टार’, ‘तमाशा’ अशा चित्रपटांचा दिग्दर्शक इम्तियाजला शाहरुखसोबत काम करण्याची ब-याच वर्षांपासून इच्छा होती. हा चित्रपट आपण खास त्याच्यासाठी लिहिला असल्याचे इम्तियाजचे म्हणणे आहे. ALSO READ : इम्तियाज अलीचा पुढील चित्रपट जपानी संस्कृतीवर!या चित्रपटात शाहरूख खान एका गाईडची भूमिका साकारणार असल्याचे कळतेय. तर अनुष्का एका गुजराती मुलीच्या भूमिकेत आहे. अनुष्का फिरायला युरोप टूरवर जाते आणि तिथेच तिला शाहरूख भेटतो, असे याचे कथानक आहे. तूर्तास तरी यापेक्षा अधिक माहिती नाही. खरे तर इम्तियाजच्या या चित्रपटाबद्दल सध्या कमालीचा सस्पेन्स ठेवला जात आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय, कदाचित त्यामागे हेच कारण असावे. सध्या आपण या चित्रपटाचा लीक झालेला फोटो पाहुयात. या फोटोने तुमची उत्सुकता कमी होण्याऐवजी आणखी वाढणार, हे आम्हाला नक्की ठाऊक आहे. पण थोडी प्रतीक्षा तर आलीच ना!