शबाना आझमी २०१७ साली दिसणार तीन चित्रपटांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 19:57 IST
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी प्रयोगात्मक व समानांतर भूमिकांसाठी ओळखल्या जातात. फार कमी व मोजक्या चित्रपटातून लक्षवेधी भूमिकांसाठी शबाना आझमी ...
शबाना आझमी २०१७ साली दिसणार तीन चित्रपटांत
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी प्रयोगात्मक व समानांतर भूमिकांसाठी ओळखल्या जातात. फार कमी व मोजक्या चित्रपटातून लक्षवेधी भूमिकांसाठी शबाना आझमी यांची ओळख आहे. अशातच शबाना आझमीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०१७ सालात शबाना आझमी तीन चित्रपटात झळकणार आहेत.ओके जानूच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी आलेल्या शबाना आझमी यांनी मीडियाशी चर्चा केली. त्या म्हणाल्या, ‘लवकरच तुम्ही मला मोठ्या पडद्यावर पाहणार आहात. या वर्षी मी तीन चित्रपटात दिसणार आहे. पहिला अमेरिकी चित्रपट ‘सिंगापूर मुव्ह’, दुसरा प्रेमचंद यांच्या ईदगाह या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाला पियुष पंजावानी दिग्दर्शित करीत आहे. तिसरा चित्रपट अपर्णा सेन दिग्दर्शित करीत असलेला ‘सोनाट’. सोनाट हा इंग्रजी चित्रपट आहे’. मागील वर्षी शबाना आझमी जुही चावला हिच्या सोबत चॉक अॅण्ड डस्टर या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटासाठी त्यांची प्रशंसा करण्यात आली होती, मात्र बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट यश मिळवू शकला नाही. यानंतर शबाना वर्षभर कोणत्याच चित्रपटात झळकल्या नाहीत. सोशल मीडिया विशेषत: ट्विटरवरून त्या चित्रपटासह विविध विषयांवर आपल्या प्रतिक्रिया देत असतात. ओम पुरी यांच्या निधनावर शबाना यांनी प्रतिक्रिया देत असा अॅक्टर पुन्हा होणार नाही असे मत व्यक्त केले होते. शबाना आझमी यांनी ओम पुरी यांच्यासोबत अनेक चित्रपटात भूमिका के ल्या आहेत. ‘ओके जानू’चा उल्लेख करून शबाना आझमी म्हणाल्या, ‘ओके जानू’ हा चित्रपट चांगला आहे. यात एक प्रकारचे नाविण्य आहे. कलाकारांचा अभिनय देखील चांगला आहे. शाद अलीच्या दिग्दर्शनात रविचंद्रन यांने केलेली फोटोग्रॉफी चांगली आहे.