Join us  

आमिर खानच्या या चित्रपटाचा बनणार सीक्वल, सीआरपीएफच्या जवानांवर आधारीत आहे कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 12:37 PM

आमिर खानचा हा चित्रपट सीआरपीएफ जवानांसाठी समर्पित करण्यात येणार आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि सोनाली बेंद्रे यांच्या 'सरफरोश' चित्रपटाचा सिक्‍वल येणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट सीआरपीएफ जवानांसाठी समर्पित करण्यात येणार आहे. चित्रपट निर्माता जॉन मॅथ्यू मॅथन यांनी हा चित्रपट केंद्रीय राखीव पोलीस दलास समर्पित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मॅथन यांना  १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सरफरोश' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

या चित्रपटाच्या सीक्‍वलबाबत जॉन मॅथ्यू मॅथन म्हणाले की, 'सरफरोश २'चे पटकथा पूर्ण करण्यापूर्वी ती मी पाच ते सहावेळा लिहून काढली आहे. वास्तवमध्ये ही 'सरफरोश २'ची पाचवी पटकथा आहे. या पटकथेला आता अंतिम रूप देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाचा सिक्‍वल हा भारताच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर आधारित आहे.

यात विविध समस्या निर्माण होत असतानाही भारताची सुरक्षा व्यवस्था मजबूत असल्याचे दाखविण्यात येणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील कलाकार अद्याप निश्‍चित करण्यात आलेले नाही. 'सरफरोश'मध्ये आमिर खानसह नसरुद्दीन शाह यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आता या सीक्‍वलमध्ये कोण-कोण कलाकार दिसणार आहे याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर आमिर खान 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसणार आहे. 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट टॉम हँक्सचा फॉरेस्ट गम्पपासून प्रेरीत होऊन बनवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे. . 'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. 'लाल सिंग चड्ढा' यानंतर आमिर गुलश कुमार यांचा बायोपिक मुगलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सुरुवातीला जेव्हा चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा अभिनेता अक्षय कुमार 'मुगल' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार होता. नंतर हा चित्रपट आमिर खानकडे आला.

टॅग्स :आमिर खान