Join us

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा खासदारकीचा राजीनामा देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 19:22 IST

संविधानाच्या नियमाप्रमाणे मनोरंजन आणि क्रिडासह विविध क्षेत्रातील 12 जणांची खासदार म्हणून नियुक्ती केली जाते. पण त्यांची सभागृहात सतत गैरहजेरी ...

संविधानाच्या नियमाप्रमाणे मनोरंजन आणि क्रिडासह विविध क्षेत्रातील 12 जणांची खासदार म्हणून नियुक्ती केली जाते. पण त्यांची सभागृहात सतत गैरहजेरी असते. याचा अर्थ असा की त्यांना यामध्ये आवड नाही नाही. तसे असल्यास त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा. राज्यसभेत नियुक्त केलेल्या 12 जणांमध्ये सचिन तेंदुलकर, रेखा,जावेद अख्तर, अनु आगा, संभाजी छत्रपती, स्वप्न दासगुप्ता, रूपा गांगुली, नरेंद्र जाधव, एमसी मैरीकॉम, के पारासरन, गोपी सुरेश, सुब्रमण्यन स्वामी आणि केटीएस तुलसी यांचा समावेश आहे. यापैकी सर्वात जास्त गैरहजर राहण्याचे प्रमाण रेखा आणि सचिन यांचेच जास्त आहे. त्यामुळे त्यांना देण्यात आलेले खासदाकीचे महत्त्व समजत नसेल तर सचिन आणि  रेखा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत केली आहे.त्यामुळे आता आगामी काळात रेखा हे खासदारकी पदाचा राजीनामा देणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.