Join us  

शाहरुख खानचे वाढते स्टारडम पाहून सरोज खान यांनी दिलेला 'तो' सल्ला अखेर ठरला खरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 11:36 AM

सरोज खान यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. आज सकाळी त्यांचे निधन झाले. निधनानंतर लगेच मलाड येथील दफनभूमीत त्यांना ‘सुपूर्द ए खाक’ करण्यात आले. यावेळी केवळ त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होत्या. सरोज खान यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या यशामध्ये सरोज खानचा यांचा हात आहे.  सरोज खान यांच्या कोरिओग्राफीमुळे अनेक सिनेमा हिट झाले आहेत. शाहरुख खानच्या यशात देखील सरोज खान यांचा हात आहेत.

एका मुलाखती दरम्यान शाहरुख म्हणाला होता की, सरोज खान यांनी एकदा माझ्या कामाला बघून सांगितले होते की, कधीच कामाला नको म्हणू नकोस. कारण जे ते मिळत नाही तेवढा दु:ख जास्त होते. जेव्हा सरोज खान यांच्या सारखी एखादी व्यक्ती तुम्हाला ही गोष्ट सांगते तेव्हा त्याचा अर्थ खूप जास्त असतो. मी बर्‍याच लोकांना या इंडस्ट्रीत कामसाठी संघर्ष करताना पाहिले आहे, जेव्हा त्यांना काम मिळते तेव्हा ते यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतात. त्यानंतर एकवेळ अशी येते की त्यांना पुन्हा काम मिळणं बंद होते. 

सरोज खान यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरली. शाहरुख पुढे तो म्हणाला, सरोजजींनी मला सांगितले होते की कामाच्या दरम्यान कोणताच बहाणा बनवून नकोस. आज सरोज खान यांनी शाहरुखला सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरली. 

सरोज खान यांनी शिकवलेल्या नृत्यमुळे बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना यश मिळाले. 1983 साली त्यांनी 'हिरो' चित्रपटातील गाण्यांची कोरियोग्राफी केली होती. तर कलंक हा त्याच्या शेवटचा सिनेमा आहे. आपल्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी सरोज खान यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. 

टॅग्स :सरोज खानशाहरुख खान