पाहा, शाहरूख अन् गौरी खानच्या प्रेमाची साक्ष देणारे काही जुने फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST
बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडचे एक मेड फॉर इच अदर कपल. बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात अनेक नाती अल्पजीवी ठरतात. पण शाहरूख व गौरीचे नाते अतूट आहे. आज गौरीने शाहरूखसोबतचा एक जुना फोटो पोस्ट करून जुन्या स्मृतींना उजाळा दिला. आम्हीही गौरी व शाहरूखचे असेच काही जुने पण ‘बेमिसाल’ फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पाहा, शाहरूख अन् गौरी खानच्या प्रेमाची साक्ष देणारे काही जुने फोटो!
बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडचे एक मेड फॉर इच अदर कपल. बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात अनेक नाती अल्पजीवी ठरतात. पण शाहरूख व गौरीचे नाते अतूट आहे. आज गौरीने शाहरूखसोबतचा एक जुना फोटो पोस्ट करून जुन्या स्मृतींना उजाळा दिला. आम्हीही गौरी व शाहरूखचे असेच काही जुने पण ‘बेमिसाल’ फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.गौरी १४ वर्षांची आणि शाहरूख उणापुरा १९ वर्षांचा असताना त्यांची प्रथम नजरानजर झाली. शाहरूखने गौरीला पाहिले आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. शाहरूखने गौरीसमोर स्वत:चे प्रेम व्यक्त केले. सुरुवातीला गौरी नकार देत राहिली. पण शाहरूखचे खरे प्रेम पाहून ती त्याच्यापासून फार काळ दूर राहू शकलीच नाही आणि मग सुरु झाली एक प्रेम कहाणी. शाहरूख गौरीबद्दल अतिशय पजेसिव्ह होता. इतका की, तिने स्वीमसूट घातलेला वा केस मोकळे सोडलेले शाहरूखला चालायचे नाही. तो या मुद्यावरून तिच्यासोबत भांडायला उठायचा. शाहरूख व गौरीचे धर्म वेगवेगळे होते. त्यामुळे प्रेम लग्नात बदलण्यासाठी दोघांनाही बरेच तेल गाळावे लागले. दोघांच्याही कुटुंबाचा या लग्नाला प्रखर विरोध होता. पण अखेर दोघांच्याही प्रेमापुढे घरच्यांना झुकावेच लागले. २६ आॅगस्ट १९९१ रोजी शाहरूख व गौरी दोघांनी कोर्ट मॅरेज केले. यानंतर दोघांचा ‘निकाह’ झाला. यावेळी गौरीचे नाव बदलून आयशा ठेवण्यात आले. २५ आॅक्टोबर १९९१ रोजी दोघांचाही हिंदू परंपरेने विवाह झाला.