पाहा : ‘उडी उडी जाये’ गाण्यातील शाहरूख खान-माहिरा खान यांची पतंगबाजी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 18:30 IST
गुजरातमधील ‘उत्तरायण’ आणि महाराष्ट्रातील ‘मकरसंक्रांत’ या सणाचे मुहूर्त साधून नुकतेच ‘रईस’ चित्रपटातील ‘उडी उडी जाये’ हे गाणे लाँच करण्यात आले आहे.
पाहा : ‘उडी उडी जाये’ गाण्यातील शाहरूख खान-माहिरा खान यांची पतंगबाजी...
महाराष्ट्रीयन संस्कृतीत मकरसंक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व असून अवघ्या दोन दिवसांवर हा सण येऊन ठेपलाय. सणाला विशेषत्वाने पतंग उडवला जातो. अशीच काहीशी परंपरा यादरम्यान गुजरातमध्ये असते. गुजरातमधील ‘उत्तरायण’ आणि महाराष्ट्रातील ‘मकरसंक्रांत’ या सणाचे मुहूर्त साधून नुकतेच ‘रईस’ चित्रपटातील ‘उडी उडी जाये’ हे गाणे लाँच करण्यात आले आहे. या गाण्यात शाहरूख खान आणि माहिरा खान यांची रोमँटिक केमिस्ट्री दिसून येतेय. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरूखने संक्रांतीच्या दिवशी खास चाहत्यांसाठी पतंग उडवण्याचे ठरवले आहे. या गाण्यात पतंगबाजीचे सीन्स असून दरम्यान त्यादोघांमधील रोमान्स हे गाण्याचे विशेष म्हणावे लागेल. गुजरातमधील प्रसिद्ध डान्सप्रकार ‘गरबा’ या नृत्यावर ते दोघे डान्स करत असताना दिसत आहेत. नक्कीच त्यांच्यातील ही केमिस्ट्री तुम्ही पाहा : ‘उडी उडी’ गाण्याचे विशेष आणि महत्त्व दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी सांगितले. ते म्हणाले,‘गुजरातमध्ये ‘उत्तरायण’ हा एक खुप मोठा सण असतो. गरबा नृत्य हा आमच्या राज्याचा सर्वांत लोकप्रिय डान्सप्रकार मानला जातो. गुजरातमध्ये जर एखाद्या चित्रपटाची शूटिंग सुरू असेल तर ती गरबा नृत्याच्या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. शाहरूखच्या चित्रपटातील व्यक्तीरेखेला पतंग उडवायला प्रचंड आवडत असतं म्हणून चित्रपटाच्या टीमने खास सुरतवरून पतंगाचा ‘मांजा’ (दोरा) मागवला आहे. यातील शाहरूखचा एक डायलॉग लक्ष वेधून घेतो. ‘अगर काटने का डर होता ना, तो पतंग नही चढाता, फिरकी पकडता.’ शाहरूख खानचा चित्रपट आणि त्याच्या आवाजातील एखादा डायलॉग नाही, असे शक्य आहे का? फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी निर्मित ‘रईस’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. चित्रपट मागील वर्षी २५ जानेवारीला ईदच्या मुहूर्तावर सलमान खानच्या ‘सुल्तान’ सोबत रिलीज होणार होता. मात्र, बॉक्स आॅफिस टाळण्यासाठी निर्मात्यांनी जानेवारीत चित्रपट रिलीज करायचे ठरवले. आता हृतिक रोशनचा होम प्रोडक्शन असलेल्या ‘काबील’ चित्रपटासोबत रिलीज होणार आहे. पाहूयात, बॉक्स आॅफिसवर ‘रईस’ आणि ‘काबील’ हा संघर्ष कसा होतो ते!